सोलापूर - राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढत आहेत. त्यामुळे, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रुग्ण व्यवस्थेवर ताण पाडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. राज्यातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही त्या पद्धतीने राज्य सरकार नियोजन करत आहे. तरी यामध्ये कोणीही राजकारण करू नये, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा - पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक; उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा : निरीक्षक शिल्पी सिन्हा
जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी सदर टोला लगावला.
आमदार भारत भालकेंनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागणार
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी भरपूर विकासाची कामे केली आहेत. भारत नाना गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे, मात्र त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत मते मागणार असल्याचे पाटील यांनी सांगतिले.
वैद्यकीय सल्ल्यानंतर शरद पवार प्रचार सभेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे, पवार यांना पंढरपूर येथे प्रचार सभा घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला गरजेचा असणार आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या सभा होणार की नाही, याबाबत सांगितले जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर, राज्यासह जिल्ह्यातील नेत्यांच्या सभा या ठिकाणी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला विचार न घेता निर्णय घेतले जातात, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारची बिघाडी महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही. सन्माननिधी वाटपाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांची काही मागणी असेल तर त्याचे निरसन केले जाणार
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन पाटील यांनी महाविकास आघाडी विरोधात अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यावर, राजू शेट्टी यांची काही मागणी असेल तर त्याचे निरसन केले जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हेही वाचा - कडबा घेऊन जाणाऱ्या वाहनाने घेतला पेट; दोन शेतकरी गंभीर