ETV Bharat / state

दफनभूमीच्या मागणीसाठी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; प्रशासनाने अडवली शववाहिका - tandulwadi

बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथे अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या दफनविधीसाठी पुनर्वसन गावाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नव्हती. या मागणीकरिता या गावातील चाँद गुलाब शेख यांच्यासह अन्य ग्रामस्थ शासन दरबारी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या पुनर्वसन शाखेने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची ही मागणी शासन दरबारी धूळखात पडली होती.

आंदोलक
author img

By

Published : Aug 25, 2019, 10:18 PM IST

सोलापूर- अंत्यविधी करण्यासाठी दफनभूमी उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवण्याचा बेत असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी वाटेतच अडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दफनभूमीच्या मागणीसाठी बार्शी तालुक्यातील आंदोलक मृतदेहासह सोलापूरला येत होते. मात्र ग्रामीण पोलिसांनी त्यांना शहरापासून १० किलोमीटर त्यांची शववाहिका रोखून धरली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही त्याच ठिकाणी आंदोलन सुरू केले आणि दफनभूमीची मागणी लावून धरली.

आंदोलनाबाबत माहिती देताना हसीब नदाफ आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके

बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथे अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या दफनविधीसाठी पुनर्वसन गावाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नव्हती. या मागणीकरिता या गावातील चाँद गुलाब शेख यांच्यासह अन्य ग्रामस्थ शासन दरबारी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या पुनर्वसन शाखेने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची ही मागणी शासन दरबारी धूळखात पडली होती. परिणामी गावातील मुस्लिमांना दफनविधीसाठी १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी येथील दफनभूमी शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गावाच्या ठिकाणी शासनाने २० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती.

दफनभूमीच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणारे चाँद शेख यांचे झाले निधन

दरम्यान मौलाना आझाद विचार मंचच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी देखील या दफनभूमीच्या मागणीसाठी आंदोलने सुरू केली होती.त्यात चाँद शेख यांचाही सहभाग होता. बार्शी येथील उडान फाउंडेशन सुद्धा शासन दरबारी पत्रव्यवहार करीत होते. अशात चाँद शेख यांचे अल्पशः आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या दफनविधीसाठी जागा मिळावी, यासाठी सदरील संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार, पुनम गेट चौक आणि काँग्रेस भवन परिसरात शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला. या तीन ठिकाणी बंदोबस्त लावल्याने नेमके आंदोलन कोठे होईल, याबद्दल संभ्रमावस्था होती. दरम्यान तुळजापूर रस्त्यावर असलेल्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सोलापूर शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर एक शववाहिका अडवली. त्यातच चाँद शेख यांचे शव ठेवण्यात आले होते.

शववाहिकेला तुळजापूर रस्त्यावरील दर्शन हॉटेल जवळ थांबविण्यात आल्याचे समजताच सदरील संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी जिथे शववाहिका रोखून धरण्यात आली होती, तेथेच आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दफनभूमीसाठी जागा उपलब्धतेचे लेखी पत्र प्रशासनाकडून उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अथवा मृतदेहावर अंत्यविधी करणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

सरपंच व तहसीलदार यांच्या समोपचाराने निवळले आंदोलन

शेवटी तांदुळवाडी गावचे सरपंच विकास हरिश्चंद्र गरड आणि बार्शी तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी त्या आंदोलनस्थळी भेट दिली. दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सामोपचाराने हे आंदोलन संपविण्यात आले. त्यानंतर मृतदेह दफनविधीसाठी तांदुळवाडी गावाकडे परत नेण्यात आला.

Intro:mh_sol_03_death_contro_7201168

प्रशासनाचा अजब कारभार, मृतदेह असलेली शववाहिका अडविली,

स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार होते आंदोलन

सोलापूर -

अंत्यविधी करण्यासाठी दफनभूमी उपलब्ध करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने, मृताचे शव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवून आंदोलन करू पाहणाऱ्या आंदोलनकर्त्यांची शववाहिका ग्रामीण पोलिसांनी शहरापासून १० किलोमीटर अंतरावर रोखली. त्या आंदोलनकर्त्यांची शहरात येण्यापूर्वीच शववाहिकेला ग्रामीण पोलिसांनी अडविल्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी आंदोलन सुरू केले आणि दफनभूमी मागणीची भूमिका लावून धरली. शेवटी बार्शी तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि तांदळवाडीचे सरपंच विकास गरड यांच्या मध्यस्थीने आणि लेखी आश्वासनानंतर मृतदेह घेऊन शववाहिका गावाकडे परत फिरविल्याने या आंदोलन मागे घेण्यात आले. Body:बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी पुनर्वसन गावाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीकरिता या गावातील चाँद गुलाब शेख यांच्यासह अन्य ग्रामस्थ शासन दरबारी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या पुनर्वसन शाखेने कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांची ही मागणी शासनाच्या दप्तरी धूळखात पडली होती.
तांदुळवाडी गावात एखाद्या मुस्लिमाचे निधन झाले तर त्यास दफन करण्यासाठी तेथे जागा उपलब्ध नसल्याने अथवा शासनाने उपलब्ध करून न दिल्याने गावापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी येथील दफनभूमी शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गावाच्या ठिकाणी शासनाने २० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. दफनभूमीच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणारे चाँद शेख यांचे काल दि. २४ ऑगस्ट रोजी निधन झाले.
दरम्यान मौलाना आझाद विचार मंचच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्य आणि स्मशानभूमी नसलेल्या समाजाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू केली होती. तांदूळवाडी येथील दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंच आणि बार्शी येथील उडान फाउंडेशन शासन दरबारी पत्रव्यवहार करीत होते. अशात गुलाब शेख यांचे अल्पशः आजाराने काल निधन झाले. त्यांच्या दफनविधीसाठी जागा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता.
आज सुट्टीचा दिवस आणि या मृताचा मृतदेह घेऊन आंदोलन करण्याच्या मौलाना आझाद विचार मंच आणि उडान फाऊंडेशनच्या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार, पुनम गेट चौक आणि काँग्रेस भवन परिसरात शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती. या तणावग्रस्त वातावरणात तीन ठिकाणी बंदोबस्त लावला गेल्याने नेमके आंदोलन कोठे होईल, याबद्दल संभ्रमावस्था होती. मौलाना आझाद विचार मंचचे प्रदेश सरचिटणीस हसीब नदाफ, जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल,शहराध्यक्ष शौकत पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून दफनभूमीसाठी जागा मागणीचे आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम होते.
तांदुळवाडीहून मृतदेह घेऊन येणारी शववाहिका शहराकडे कोणत्या रस्त्याने येते, याची निश्चित माहिती नसल्याने त्या भागातून शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर जिल्हा ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तुळजापूर रस्त्यावर असलेल्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सोलापूर शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर एक शववाहिका अडवली, त्यातच चाँद शेख यांचे शव ठेवण्यात आले होते. ती शववाहिका जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्यापूर्वीच ग्रामीण पोलिसांनी शहराबाहेरच्या अडवली.
तांदुळवाडीवरून शव घेऊन येत असलेली शववाहिका तुळजापूर रस्त्यावरील दर्शन हॉटेल जवळ थांबविण्यात आल्याचे समजताच शहरातील त्या संघटनांच्या उर्वरित कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्या गावाकडून आलेले ग्रामस्थ आणि या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिथे शववाहिका रोखून धरण्यात आली होती, तेथेच आंदोलन सुरू केले आणि दफनभूमी जागा मागणीसाठीच्या घोषणा सुरू केल्या. दफनभूमीसाठी जागा उपलब्धतेचे लेखी पत्र प्रशासनाकडून उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अथवा मृतदेहावर अंत्यविधी करणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.
शेवटी तांदुळवाडी गावचे सरपंच विकास हरिश्चंद्र गरड आणि बार्शी तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी त्या आंदोलनस्थळी येऊन दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सामोपचाराने हे आंदोलन संपविण्यात आले. त्यानंतर मृतदेह दफनविधीसाठी तांदुळवाडी गावाकडे परत नेण्यात आला.

अंत्यविधी करण्यासाठी द्या
जागा : हसीब नदाफ
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात अल्पसंख्य समाजाच्या दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्‍न अनेक ठिकाणी प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठपुरावा करून त्या - त्या समाजाला अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मौलाना आझाद विचार मंच आग्रही मागणी असल्याचे हसीब नदाफ यांनी सांगितले.
---

तालुक्यातील कोणत्याही स्मशानभूमीचा राहणार नाही प्रश्न प्रलंबित : ऋषिकेश शेळके

तांदुळवाडी येथे दफनभूमीसाठी जागा नाही ही वस्तुस्थिती आहे गावाच्या पुनर्वसन रचनेनुसार दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याशिवाय बार्शी तालुक्यातील कोणत्याही समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित राहणार नाही असे आश्वासन बार्शीचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.