ETV Bharat / state

Solapur Crime : परभणी अन् सोलापूर पोलिसांमुळे दरोडा अन् घरफोड्या उघडकीस; 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत - सोलापूर पोलीस

अक्कलकोट तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सहा दरोडेखोरांनी ग्रामस्थांना मारहाण करून दरोडा टाकला होता. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली होती. याबाबत शांताबाई दत्तात्रय कोळेकर (वय 60 वर्षे,रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली होती. सविता माने यांनाही मारहाण करून त्यांच्या घरातील रोख रक्कम, दागिने लंपास केले होते. सोलापूर पोलिसांनी व परभणी पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावून एका दरोडेखोरास अटक केली आहे. सनीदेवल सुरेश काळे (वय 25 वर्षे, रा.पानमंगरूळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) यास अटक केली आहे. पण, यासोबत असणारे सहा संशयीत दरोडेखोर अजूनही फरार आहेत.

जप्त मुद्देमाल
जप्त मुद्देमाल
author img

By

Published : Mar 31, 2022, 9:48 PM IST

सोलापूर - अक्कलकोट तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सहा दरोडेखोरांनी ग्रामस्थांना मारहाण करून दरोडा टाकला होता. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली होती. याबाबत शांताबाई दत्तात्रय कोळेकर (वय 60 वर्षे,रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली होती. सविता माने यांनाही मारहाण करून त्यांच्या घरातील रोख रक्कम, दागिने लंपास केले होते. सोलापूर पोलिसांनी ( Solapur Rural Police ) व परभणी पोलिसांनी ( Parbhani Police ) या दरोड्याचा तपास लावून एका दरोडेखोरास अटक केली आहे. सनीदेवल सुरेश काळे (वय 25 वर्षे, रा.पानमंगरूळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) यास अटक केली आहे. पण, यासोबत असणारे सहा संशयीत दरोडेखोर अजूनही फरार आहेत.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

परभणी पोलिसांनी केली अटक - सनीदेवल सुरेश काळे यावर आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत अक्कलकोट येथील शिरवळ गावात 29 ऑक्टोबर, 2021 रोजी दरोडा टाकल्याचा आरोप होता. सोलापूर पोलीस त्याचा शोध घेत होते. याची माहिती मिळताच सनीदेवल काळे हा परभणीत लपून बसला होता. पण, सनीदेवल काळे यावर परभणी येथील पूर्णा पोलीस ठाणे, पालम पोलीस ठाणे दरोडा आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. परभणी पोलिसांनी सनीदेवलचा तपास करून त्याला अटक केले होते.

सोलापूर पोलिसांकडे वर्ग करून दरोड्याची उकल - सनीदेवल काळे यास सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने ( Local Crime Branch ) आपल्या ताब्यात घेऊन दरोड्याचा तपास केला. पोलीस कोठडीत त्याने माहिती दिली की, अक्कलकोट तालुक्यातील हंनुर, चपळगाव, पानमंगरूळ, तडवळ, मोहोळ तालुक्यातील सौंदणे या ठिकाणी दरोडे घातले आहेत. यानुसार सनीदेवलवर मंद्रुप पोलीस ठाणे, कामती पोलीस ठाणे, अक्कलकोट पोलीस ठाणे येथे घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

18 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी आणि दरोडा, असे सात गुन्हे उघडकीस आणून 18 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये 39 तोळे सोन्याचे दागिने, 80 ग्रॅम चांदीचे दागिने, असा मुद्देमाल जप्त केला आहे. पण, यामधील आणखीन पाच संशयीत दरोडेखोर फरार आहेत. त्याचा तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली - ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, जितेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस कर्मचारी नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, धनराज गायकवाड ,समीर शेख, अनिस शेख, प्रवीण वाळके, हेमंत चिंचोळकर यांनी केली आहे.

हेही वाचा - सोलापूर पोलिसांनी उस्मानाबाद अन् अहमदनगर जिल्ह्यातून आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.