ETV Bharat / state

पंढरपूरच्या तरुणांचा पुढाकार, कोरोना वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना बेड्सची करताहेत मदत

जिल्ह्यात कोरोनाचं संकट वाढत असताना अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी समोर येत आहे. अशातच कोरोना काळात शिवछत्रपती तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले आहे. शिवछत्रपती मंडळाकडून 'आमची मोहीम तुमची साथ' या माध्यमातून वार रूम तयार करण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार व बेड उपलब्ध करून देत आहेत.

Corona War Room
Corona War Room
author img

By

Published : May 11, 2021, 8:51 AM IST

पंढरपूर - राज्यासह सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्याची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच रुग्णांना उपचारासाठी विविध कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, बऱ्याचदा रुग्णांना कशा पद्धतीने बेड उपलब्ध करता येईल, याची माहिती नसते. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचे प्राणही जात आहे. याच पार्श्वभूमिवर पंढरपूर येथील शिवछत्रपती तरुण मंडळाने वॉर रूम संकल्पना तयार केली आहे. त्यातून पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यातील रुग्णाला लागणाऱ्या बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे. मंडळात तरुण कार्यकर्त्यांकडून या संकल्पनेतून शेकडो रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध करून दिले आहे. हे तरुण कोरोना रुग्णांना कोरोनाच्या संकटात मदतीचा हात देत आहे.

शिवछत्रपती मंडळाची 'आमची मोहीम.. तुमची साथ'..

जिल्ह्यात कोरोनाचं संकट वाढत असताना अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी समोर येत आहे. अशातच कोरोना काळात शिवछत्रपती तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले आहे. शिवछत्रपती मंडळाकडून 'आमची मोहीम तुमची साथ' या माध्यमातून वार रूम तयार करण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार व बेड उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी मंडळातील तरुणांनी पश्चिम महाराष्ट्रातील हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टरांशी संपर्क साधून त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या ऑक्सीजन बेड, ओटू बेड, बायपास बेड यांची यादी तयार केली आहे.

माहिती देताना मंडळाचे सदस्य डॉ. करीम...

मंडळातील तरुण कार्यकर्त्यांकडून बेडचे व्यवस्थापन..

शिवछत्रपती मंडळातील कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोविड हॉस्पिटलची यादी तयार केली आहे. त्यातून हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून व्हाट्सअप ग्रुपवरून शेअर केली जाते. जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांचे फोन मंडळातील कार्यकर्त्यांना येत असतात. कार्यकर्त्यांकडून कोरोना बाधित रुग्णांची सध्याची असणारी परिस्थिती लिहून घेतली जाते. त्यानुसार रुग्णालयांशी संपर्क साधून बेड उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे रुग्णाला वेळेत बेड उपलब्ध होतो आणि त्याच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. या उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.

शिवछत्रपती मंडळाचे सामाजिक बांधिलकी..

शिवछत्रपती तरुण मंडळ हे गणपती उत्सवात समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. सध्याच्या कोविड परिस्थितीतही शिवछत्रपती मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मंडळात सर्व तरुण कार्यकर्ते वाररूमच्या माध्यमातून दिवस-रात्र कार्यरत आहेत. कोरोना काळामध्ये शिवछत्रपती मंडळाकडून पंढरपुरातील नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या कुटुंबातील नागरिक वयोवृद्ध आहेत. त्यांना घराबाहेर पडता येत नाही, अशा कुटुंबीयांना मंडळातील कार्यकर्त्यांकडून मदत केली जाते.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - 3 हजार कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कविता चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.