ETV Bharat / state

Pandharpur Wari 2021 - गोपाळकाल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता - पालखी

पौर्णिमेच्या दिवशी पंढरीतील गोपाळपूर येथे गोपाळकाला पार पडला. गोपाळकाल्याच्या कीर्तनानंतर आषाढी वारीची सांगता करण्यात आली. आता पालख्या परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. सर्व पालख्या शिवशाहीने परत जाणार आहेत.

Pandharpur
Pandharpur
author img

By

Published : Jul 24, 2021, 9:11 PM IST

पंढरपूर - आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या नऊ पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. त्यामधील रखुमाई माता व संत निळोबा महाराज यांची पालखी शुक्रवारी (23 जुलै) परत गेली. आज (24 जुलै) पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे गोपाळकाला पार पडला. गोपाळपूर येथील गोपाळकाल्याचे मंदिर मात्र प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आले होते. मात्र, मानाच्या सात पालख्यांनी गोपाळपूर येथील गोपाळकाल्याच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. गोपाळकाल्याचे किर्तन महाराज मंडळींकडून करण्यात आले. गोपाळकाल्याच्या कीर्तनानंतर आषाढी वारीची सांगता करण्यात आली.

गोपाळकाल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता

श्रीविठ्ठल मंदिरात संतांच्या पादुकांच्या भेटी-

पांडुरंगाच्या भेटीसाठी आज मानाच्या सात पालख्या मंदिरात दाखल झाल्या होत्या. विठुरायाचे दर्शन आज संतांनी घेतले. त्यानंतर श्री विठ्ठल मंदिरामध्ये संतांच्या पादुकांच्या भेटीही पार पडल्या. यामध्ये संत सोपानकाका, निवृत्ती महाराज, संत चांगावाटेश्वर महाराज, मुक्ताबाई यांच्या पादुका भेटींचा अनोखा सोहळा मंदिरात पार पडला.

आषाढी वारी 2021 संपन्न
आषाढी वारी 2021 संपन्न

पंढरीतून पालख्यांचा परतीचा प्रवास-

गोपाळपूर येथील गोपाळकाल्याने आषाढी वारी सोहळ्याची सांगता करण्यात आली. त्यानंतर आता मानाच्या सात पालख्या परतीचा प्रवास करणार आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह मानाच्या पालख्या विठुरायाचा निरोप घेऊन आपल्या घरी जात असतात. शिवशाही बसच्या माध्यमातून या सर्व मानाच्या पालख्या परत जाणार आहेत.

हेही वाचा - 'बा पांडुरंगा! पुन्हा तो पंढरीचा सोहळा पाहू दे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.