ETV Bharat / state

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या, उद्या होणार मतदान - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक प्रचार बातमी

आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे यासाठी पोटनिवडणूक होत आहे. गुरूवारी प्रचाराचा शेवट झाला असून शनिवारी(१७ एप्रिल) मतदान होणार आहे.

Pandharpur-Mangalvedha Assembly by-election
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक
author img

By

Published : Apr 16, 2021, 10:15 AM IST

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक प्रचाराचा झंझावात शांत झाला आहे. ही पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारामध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. राज्याच्या राजकारणामध्ये आता पंढरपूरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. अपक्ष उमेदवारांनी देखील आपली दावेदारी मजबूत केली आहे. उद्या (17 एप्रिल) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

17 एप्रिलला होणार मतदान -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या रिक्त जागेसाठी 17 मार्चपासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली तर चार एप्रिलपासून प्रचाराची सुरूवात झाली. यामध्ये प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, भेटी-गाठी घेण्यात आल्या. अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उठवला. 17 एप्रिल रोजी मतदार उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

महाविकास आघाडी व भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना रिंगणात उतरवण्यात आले. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता मामा भारणे, आमदार संजय शिंदे, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, उदय सामंत तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांनी तळागळातील कार्यकर्त्यांना सोबत घेत सर्व मतदारसंघ पिंजून काढला. राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा दगाफटका बसणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. भाजपचे समाधान आवताडे यांनी आमदारकीसाठी जोर लावला आहे. त्यांच्या प्रचाराची यंत्रणाही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांभाळली. सभा व प्रचार रॅलीतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे त्यांच्या उमेदवारासाठी एकटेच खिंड लढवत आहेत.

राष्ट्रीय मुद्द्यांवरून निवडणुकीत प्रचाराचा धुरळा -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रस्थापित पक्षांकडून राष्ट्रीय मुद्द्यांवरून निवडणूक लढवली जात आहे. महाविकास आघाडीने वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांनी जनतेसमोर मांडला. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तरे देण्यात आली. तर, भाजपकडून महाविकास आघाडीच्या वर्षभरात केलेल्या कामांची पोल-खोल करण्यात आली. भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न हा प्रचारात कळीचा मुद्दा बनला तर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्नांना प्रस्थापित नेत्यांकडून फाटा देण्यात आल्या. त्याऐवजी राष्ट्रीय मुद्द्यांवरून निवडणूक रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित पक्षांना दिले आव्हान -

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत प्रस्थापित उमेदवारांकडून राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात आहे. अपक्ष उमेदवार असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालत मतांचा जोगवा मागितला. त्यांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते पंढरपुरात तळ ठोकून होते. तर, निवडणुकीतील एकमेव महिला उमेदवार शैला गोडसे यांनी साखर कारखानदारांविरुद्ध जोर लावला आहे. त्यांच्या मदतीला जनहित शेतकरी संघटनेचे नेते देशमुख यांनी प्रचार प्रमुख म्हणून भूमिका बजावली. तर, भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी भाजपा समोर चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. त्यांना रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्नही करण्यात आले होते. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे प्रस्थापितांसमोर अपक्ष उमेदवारांचे कठीण आव्हान असणार आहे.

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांच्या काही अपेक्षा असतील तर केंद्र सरकार नक्कीच विचार करेल'

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.