ETV Bharat / state

आमदार भारत भालके यांची प्रकृती स्थिर, पंढरपुरात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा.. - आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीविषयी पंढरपुरात उलट-सुलट चर्चा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती भारत भालके यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू असून आमदार भारत भालके यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

MLA Bharat Bhalke
आमदार भारत भालके
author img

By

Published : Nov 27, 2020, 4:25 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती भारत भालके यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. 26 नोव्हेंबर रोजी भारत भालके यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कार्यकर्त्यांकडून प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना -

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू असून आमदार भारत भालके यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

आमदारकीतून विकासाची अनेक कामे -

आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवले होते. पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमदार भारत भालके हे पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार म्हणून १२ वर्षे झाले काम करत आहेत. या मतदारसंघांमधून विविध पक्षातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवून जिंकली आहे. 2009 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक तर 2019 साली ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा भारत भालके पराभव केला होता. मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात आमदारकीच्या माध्यमातून भारत नाना भालके यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.