ETV Bharat / state

Magh Wari Pandharpur 2022 : वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत माघी यात्रेबाबत निर्णय - प्रांताधिकारी गजानन गुरव - विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपूर

12 फेब्रुवारी 2022 रोजी माघी यात्रा पार पडणार ( Magh Wari Pandharpur ) आहे. मात्र, कोरोनाच्या अनूषंगाने वारकरी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत माघी यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गजानन गुरव यांनी दिली.

Magh Wari Pandharpur
Magh Wari Pandharpur
author img

By

Published : Jan 27, 2022, 7:56 AM IST

पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत माघी यात्रेबाबत ( Magh Wari Pandharpur ) जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि माघी यात्रेबाबत प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. या कालावधीत कोरोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव ( Corona Cases Increases ) वाढू नये. तसेच ही वारी सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी संबधित सर्व विभागाने समन्वय राखून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव ( Provincial Officer Gajanan Gurav ) यांनी दिल्या.

माघ वारी पुर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी गुरव म्हणाले, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली ( Corona Cases Increased Pandharpur ) आहे. माघ वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत असल्याने याबाबत सर्व संबधित विभागांनी आपणांस दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे. कोरोना चाचणी व लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित करावीत, मुबलक औषधसाठा ठेवावा, आवश्यक ठिकाणी प्रथमोचार केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

अतिक्रमणे काढून घ्यावीत

नगरपालिकेने पिण्याचे स्वच्छ पाणी, बॅरेकेटींग, मंदीर परिसर, नदीपात्रातील वाळवंट, 65 एकर परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. शहरात आवश्यक ठिकाणी निर्जतूकीकरणासाठी औषध फवारणी करत, अतिक्रमणे काढून घ्यावीत. महावितरणने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा राहील यांची दक्षता घ्यावी. अन्न व औषध विभागाने प्रसाद विक्री केंद्र, हॉटेल्स यांची वेळावेळी तपासणी करावी, अशा सूचनाही गुरव यांनी केल्या.

मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम

माघी यात्रेचा कालावधीत 5 ते 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत असून , माघ शुध्द एकादशी 12 फेब्रुवारी 2022 रोजी आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे सर्व राजोपचार ( Vitthal Rukmini Pandharpur ) सुरु राहतील. वारी कालावधीत वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेने मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम शासन आदेशान्वये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जातील, असेही गजानन गुरव यांनी सांगितले.

हेही वाचा - Complaint against Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.