ETV Bharat / state

भीमेच्या पुराने पंढरपूरचा संपर्क तुटला; कर्नाटकचे भाविकही अडकले

पंढरपुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पंढरपूरचा मंगळवेढामार्गे कर्नाटकाकडे जाण्याचा संपर्कही तुटलेला आहे.

पूरस्थिती
author img

By

Published : Aug 7, 2019, 6:53 PM IST

सोलापूर - ज्या पद्धतीने पंढरपूरचा मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याशी संपर्क सुटलेला आहे, त्याच पद्धतीने पंढरपूरचा मंगळवेढामार्गे कर्नाटकाकडे जाण्याचा संपर्कही तुटलेला आहे. यामुळे कर्नाटकातून विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक सध्या पंढरपुरातच अडकून पडले आहेत. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यापुणे भीमा नदीला महापूर आला आहे. या पुरामुळे पंढरपुरात येणारे सर्वच मार्ग पाण्याखाली गेले आहेत.

आज सकाळच्या सुमारास नदी पात्रातून काही प्रमाणात होडीतून येजा सुरू होती. पात्र पाण्याचा विसर्ग वाढल्याने तिही वाहतूक बंद करण्यात आली आहे. चंद्रभागा नदीवरील जूना दगडी पूलासह नवीन रस्ते वाहतूक व रेल्वे पूल ही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पंढरपूरातून सोलापूर, बार्शी, सातारा, सांगली, मंगळवेढा मार्गे कर्नाटक कडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.

दरम्यान, चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविकही पंढरपुरातच अडकून पडले आहेत. यामध्ये कर्नाटकच्या भाविकांचाही समावेश आहे. नदी पात्रातील पाण्यात अद्याप वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासासने पंढरपूरातील नदी काठच्या भाविकांना ६५ एकर पालखी तळ परिसरात हलविण्यात आले आहे.

Intro:सोलापूर : ज्या पद्धतीनं पंढरपूरचा मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याशी संपर्क सुटलेला आहे त्याच पद्धतीने पंढरपूरचा मंगळवेढा मार्गे कर्नाटकाकडे जाण्याचा संपर्कही तुटलेला आहे. पर्यायानं पंढरपूर लगत असलेल्या गोपाळपूरचाही पंढरपूरची संपर्क तुटला आहे.

Body:सकाळी कांही प्रमाणात होडीतून सुरु असलेली ये-जा आता पूर्णपणे बंद करण्यात आलीय. त्यामुळे एक प्रकारे उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला या पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय.

Conclusion:दरम्यान नदीपात्रातील पाण्यात वरचेवर वाढ होत असून नदीलगतच्या लोकांना 65 एकर परिसरात हलविण्यात येत आहे.तर पुढचे 15 तास हीच परिस्थिती राहणार असल्याने पंढरपूरला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना पंढरपुरातच अडकून पडावं लागलेलं आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.