ETV Bharat / state

पांडुरंग कारखान्याने उभारला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, स्कि़ड माऊंटेड पद्धतीचा पहिलाच प्रकल्प - ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांची गरज निर्माण झाली होती ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी पांडुरंग सहकारी कारखान्यांनी खारीचा वाटा उचलत आहे. सहकारी क्षेत्रात अशा पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाचा प्रकल्प आहे.

पांडुरंग कारखान्याने उभारला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

author img

By

Published : Jun 6, 2021, 7:18 AM IST

पंढरपूर(सोलापूर) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमावावे लागले. त्यानंतर राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी प्राध्यान देण्यात आले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी माहिती दिली आहे.

स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील पांडुरंग कारखान्याने उभारला आहे. 'सुपंत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प' असे या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत नाना देशमुख, कारखान्याचे कार्यकारी अधिकारी यशवंत कुलकर्णी, युवा नेते रोहन परिचारक, प्रणव परिचारक यांच्यासह असंख्य सभासद व संचालक उपस्थित होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांची गरज निर्माण झाली होती ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी पांडुरंग सहकारी कारखान्यांनी खारीचा वाटा उचलत आहे. सहकारी क्षेत्रात अशा पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे सर्व तंत्रज्ञान तैवान येथून आयात केले आहे. प्रतिदिन २५ एमक्युब एवढी त्याची उत्पादन क्षमता आहे.

गेल्या पंधरवड्यातच हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता मात्र, तौक्ते वादळामुळे अडचण आली. त्यानंतर विमानाने ही मशिनरी आणून केवळ आठ तासात त्याची उभारणी केली आहे. येथून निर्माण झालेल्या आक्सिजनच्या गुणवत्तेची चाचणी झाली असून हा ऑक्सिजन दवाखान्यात वापरण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले मिळाल्याची माहिती आमदार परिचारक यांनी दिली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.