ETV Bharat / state

उपरा'कार लक्ष्मण माने १२ एप्रिलला करणार राष्ट्रवादीत प्रवेश

उपराकार लक्ष्मण माने हे लवकरच घरवापसी करणार आहेत. येत्या १२ एप्रिलला ते बारामतीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खु

on 12 April Laxman Mane will enters in ncp
उपरा'कार लक्ष्मण मानेंची घरवापसी
author img

By

Published : Feb 13, 2020, 10:44 PM IST

Updated : Feb 13, 2020, 11:26 PM IST

सोलापूर - उपराकार लक्ष्मण माने हे लवकरच घरवापसी करणार आहेत. येत्या १२ एप्रिलला ते बारामतीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खुद्द लक्ष्मण माने यांनी स्वतः सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

लक्ष्मण माने हे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते अन विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आहेत. येत्या १२ एप्रिलला ते आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या निर्णयांमुळे भटक्यांचे नागरिकत्व धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे उपेक्षीत समाजात जाणीव जागृती करण्यासाठी 12 मार्चपासून वाड्या वस्त्यांवर भटक्‍या विमुक्त, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळापासून होणार आहे. तर या यात्रेचा समारोप 12 एप्रिल रोजी बारामतीत होणार आहे. त्याचवेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानेंनी सांगितले.

उपरा'कार लक्ष्मण मानेंची घरवापसी

लक्ष्मण माने यांनी यापूर्वी वंचित बहुजन आघाडीत बंडखोरी करत प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या नवीन पक्षाची घोषणा केली होती. मात्र, ते आता पुन्हा आपल्या जुन्याच तालमीत म्हणजे राष्ट्रवादीत जाणार असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

वंचितने आमचा फक्त वापर केला

मी पूर्वी राष्ट्रवादीत असताना राजे-महाराजांचा फार मोठा प्रभाव होता. स्थानिक पातळीवर ते मला त्रासाचं पडत होतं. म्हणून मी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. आता ते सगळे बिचारे भाजपमध्ये गेल्याने मला त्या पक्षात जायला अडचण नसल्याचे माने म्हणाले. वंचित बहूजन आघाडीने भटक्या विमुक्तांचा फक्त वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवारांना आमच्या वेदना कळतात

वंचित बहूजन आघाडीतून बाहेर पडलेल्या मानेंनी 'महाराष्ट्र बहूजन वंचित आघाडी' नावाचा नवीन पक्ष जुलै २०१९ मध्ये काढला होता. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत जात आहेत. शरद पवार यांना आमच्या वेदना, आमचे प्रश्न कळतात. इतर पक्षातील नेत्यांना त्या कळतात असा माझा अनुभव नाही. मला शरद पवार यांचा अनुभव आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. प्रत्येक जण आमच्या समाजाचा वापरच करणार असेल तर शरद पवार यांनी केला तर काय बिघडले असेही ते म्हणाले. वंचितमध्ये मी गेलो, त्यांनी आमचा वापरच क‍ेला. आमची संख्या दुबळी आहे. इतरांना आम्ही वापरू शकू अशी आमची ताकद नाही. मी राष्ट्रवादीत गेलो तर भटक्या विमुक्तांची चळवळ सुरुच राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एनआरसी आणि एनपीआर हे केंद्र सरकारचं घोंगड आमच्या गळ्यात पडणार आहे. आदिवासी, भटके विमुक्त, गरीब, शेतमजूर, दलित, वंचीत समाजातील लोक या सर्वांवर याचा परिणाम होणार आहे. आम्ही संशयीत नागरिक होऊ. असलेली पैसे-संपत्ती, घरं-दारं सर्व सोडून आम्हाला छावण्यांमध्ये जावं लागेल. समाजात जागृती करण्यासाठी मी यात्रा सुरू करणार असल्याचेही मानेंनी सांगितले.

Last Updated : Feb 13, 2020, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.