पंढरपूर- अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात दुर्वा ( हराळीची) आरास करण्यात आली आहे. श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने ही आरास करण्यात आली आहे. दुर्वांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनी केली आहे.
दरवर्षी करण्यात येते आरास
अंगारकी चतुर्थी निमित्त दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती दुर्वांची मनमोहक सजावट करण्यात येत. यंदा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये दुर्वांसह गुलाब व मोदक आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच सजावटीतून अष्टविनायक गणपतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आले. विठ्ठल-रखुमाईचे रुप डोळ्यांत साठवून घेऊयात असे वाटते.