ETV Bharat / state

सुरक्षित प्रसूतीसाठी गर्भवतीची २५० किमी पायपीट... छायाचित्रकाराने केली मदत - pregnant woman walks 250 km

9 महिन्याच्या गर्भवतीचा पुणे ते सोलापूरचा खडतर प्रवास, पुण्यात सुखरूप बाळांतपण होईल की नाही या भीतीपोटी केली पुणे ते सोलापूर पायपीट. गुलबर्ग्याला जाण्यासाठी सोलापुरातील वृत्तपत्र छायाचित्रकाराने केली मदत.

सुरक्षीत प्रसुतीसाठी गर्भवतीची २५० पायपीट

author img

By

Published : May 16, 2020, 7:12 PM IST

सोलापूर - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन अनेकांची वाताहत होत आहे. त्याच प्रमाणे सुखी संसाराची स्वप्न उराशी घेऊन पुण्यात कामासाठी गेलेल्या एका जोडप्याच्या नशिबीही बाका प्रसंग आला. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या एका महिलेस पोटात एक जीव घेऊन पुणे ते सोलापूर असा खडतर पायी प्रवास करावा लागला. मात्र सोलापुरात आल्यानंतर त्यांना एका वृत्तपत्र छायाचित्रकाराने सामाजिक बांधिलकी दाखवत मदत केली. त्यांना त्यांनी सोलापूरवरून गुलबर्ग्यासाठी जाणाऱ्या वाहनात बसवून पाठण्यात आले. यशवंत सादूल असे त्या छायाचित्रकाराचे नाव आहे.

मूळचं कर्नाटकातील गुलबर्गा येथील हे जोडप कामधंद्यानिमित्त पुण्यात गेलेलं. पुण्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्यामुळे बाळांतपण हे पुण्यातच करण्याचा निर्णय या जोडप्यानं घेतलेला. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि हे पुण्यातच अडकले. बांळतपणातील नियमित तपासणी केली जात होती, ती दवाखाने बंद आहेत. इतर कोणताही दवाखाना सुरू नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते.

पुण्यातील बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेता या जोडप्यानं पायी चालत गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. हे जोडपं पुण्यावरून चक्क सोलापूरपर्यंत पायी चालत आल्याचे त्यांनी सांगितले आहे. महिलेस 9वा महिना सुरू असतानादेखील ही गर्भवती महिला एवढ्या दूरवरून पायी चालत आल्याचे तेथील एका वृत्तपत्र छायाचित्रकार सादुल यांनी ते पाहिले. त्यानंतर त्या छायाचित्रकारातील माणूस जागा झाला आणि त्यांनी अधिकची विचारपूर केली. त्यावेळी या जोडप्याने सांगितले, की पुण्यावरून ते पायी चालत आले आहेत. आणि पुढे गुलबर्ग्याला जाणार आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यांनी येणाऱ्या वाहनांना त्यांना सहकार्य केले नाही.

त्या जोडप्याची ती अवस्था पाहून संबंधित छायाचित्रकाराने शहरातील एका व्यक्तीच्या मदतीने या जोडप्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत नेऊन सोडले. तेथून बाजार समितीपासून त्यांना गुलबार्ग्याला जाणाऱ्या एका वाहनात बसवून पाठवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.