करमाळा(सोलापूर)- तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमा नदी काटावरती कात्रज येथे असलेल्या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्हातील भाविक दर्शनासाठी येतात. पण यंदा कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
हे मंदिर तीन जिल्हाच्या हद्दीपासून जवळ व भीमा नदीच्या तिरावरती निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे भिगवण, डिकसळ, खेड, खानोटा, शिंपोरा, बाभुळगाव, रामवाडी, जिंती, कावळवाडी, भिलारवाडी, को. चिंचीली, टाकळी, खातगाव, भगतवाडी, गुलमरवाडी, पोमलवाडी, मकाई कारखाना इत्यादी गावातून भक्तगण दर्शनासाठी येतात.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कात्रज येथील ग्रामस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून २० जुलैपासून पूर्ण श्रावण महिन्यासाठी एक महिना निलकंठेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी पंचक्रोशीतील भक्तजनांनी सहकार्य करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समिती,कात्रज यांनी केलेले आहे.
दत्तात्रय धायगुडे आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, किरण कवडे अ. स. का. संचालक, नागनाथ लकडे , लतिश लकडे(पाटील), मच्छिंद्र लकडे, सोमनाथ पाटील, महेश(बापुराव)लकडे, शकंर माने, मनोहर हंडाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.