सोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. सोमवारी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 7 हजार 678 एवढी झाली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत सोलापूर शहरात 144 बाधित रुग्ण आढळले तर, ग्रामीण भागात 152 बाधित रुग्ण आढळले आहेत. शहर व ग्रामीण असे मिळून एका दिवसात 296 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सोमवारी सोलापूर शहर व ग्रामीण भागात 10 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सोलापूर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोमवारी ग्रामीण भागात 152 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 95 पुरुष व 57 महिलांचा समावेश आहे. सोमवारी 328 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उपचाराअंती ते ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर, कोरोनामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. ग्रामीण भागात आजतागायत एकूण 2 हजार 972 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 हजार 822 पुरुष तर 1 हजार 150 महिला आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजतागायत एकूण 82 रुग्ण कोरोना विषाणू जन्य आजाराने दगावले आहेत.
सोलापूर शहरात सोमवारी 144 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात सोमवारच्या अहवालानंतर शहराची एकूण रुग्णसंख्या झाली 4 हजार 707 झाली आहे. सोमवारी 3 हजार 47 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 2 हजार 903 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर, 144 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सोमवारी कोरोनाने 3 जणांचा बळी घेतला आहे. सोमवारच्या मृत्यू अहवालानंतर शहरात एकूण आजतागायत 348 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
एकूण स्थिती
पॉझिटिव्ह रुग्णसंख्या
शहर - 4707
ग्रामीण - 2972
एकूण - 7679
मृत्यूसंख्या
शहर - 348
ग्रामीण - 82
एकूण - 430