ETV Bharat / state

महागाईविरोधात सोलापुरात राष्ट्रवादीचे थाळी बजाओ आंदोलन

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

महागाईविरोधात सोलापुरात राष्ट्रवादीचे थाळी बजाओ आंदोलन
महागाईविरोधात सोलापुरात राष्ट्रवादीचे थाळी बजाओ आंदोलन
author img

By

Published : Mar 13, 2021, 1:43 PM IST

सोलापूर : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाओ आंदोलन शनिवारी करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

महागाईविरोधात सोलापुरात राष्ट्रवादीचे थाळी बजाओ आंदोलन

वाढती बेरोजगारी, महागाईमुळे तरुणांच्या हाथी फक्त थाळी
वाढती बेरोजगारी आणि महागाईमुळे अन्न व पाण्याविना रिकामी थाळी वाजवण्याची वेळ तरुणांवर आली आहे. कुंभकर्णी झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जाग यावी यासाठी सर्वसामान्यांचा आक्रोश थाळी बजावो आंदोलनातून व्यक्त केल्याचे आंदोलक यावेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार हे थाळी बजाओ आंदोलन केल्याचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. "देश की जनता रो रही है, मोदी सरकार सरकार सो रही है","या सरकारचा करायचं काय, खाली मुंडी वर पाय", "महागाई कमी झालीच पाहिजे", मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

महागाईमुळे गरीब जनतेची पिळवणूक
केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून महागाईचा भडका उडाला आहे. दर महिन्याला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. यामुळे अन्नधान्याच्या दरांत भरमसाठ वाढ होत आहे. यामुळे गोरगरीब जनता भरडली जात आहे. जनतेची एक प्रकारे पिळवणूक होत आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीची असेल असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव म्हणाले.

आंदोलनात पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. लग्न समारंभ, आंदोलन आदी कार्यक्रमात पन्नास पेक्षा अधिक लोकांना परवानगी दिली जात नाही. मात्र शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या थाळी बजावो आंदोलनात पन्नासहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर अध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, शफी इनामदार, मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, सुभाष पाटणकर, राजन जाधव, जनार्दन कारमपुरी, नाना काळे, अमीर शेख, जावेद खैरदी, आरती हुल्ले, सुनीता रोटे, बिस्मिल्ला शिकलगर, तन्वीर गुलजार, सायरा शेख, वसीम बुऱ्हाण, राजू कुरेशी, गफूर शेख, रुपेश भोसले, शिवाजी मंगोडेकर आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.