ETV Bharat / state

Ajit Pawar Solapur Tour : अजित पवारांच्या स्वागताचा पूर्वसंध्येला ज्योतिबा गुंड यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; शिंदे गटात केला प्रवेश - Ajit Pawar Solapur Tour

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजगी पुन्हा एकदा उफाळून बाहेर आली आहे. राष्ट्रवादीपक्षाला लागलेली गळती थांबता थांबेना झाली आहे. राष्ट्रवादीमधील स्थानिक नेते व पदाधिकारी हे स्थानिक पातळीवरील वरीष्ठ नेत्यांना कंटाळून पक्ष सोडून जात आहेत. ज्योतिबा गुंड यांनी वरीष्ठ नेत्यांना कंटाळून शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती दिली.

Jyotiba Gund Join Shivsena
पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
author img

By

Published : May 31, 2023, 9:48 PM IST

सोलापूर: सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला आहे. ज्योतिबा गुंड यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, सोलापूर राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व पक्ष निरीक्षक यांच्या कामकाजाला किंवा मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी सोडून जात असल्याची खंत व्यक्त केली. अजित पवारांच्या स्वागताला जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करून हार तुऱ्यांचा बंदोबस्त केला. शहर भर बॅनर लावले, मोठी जय्यत तयारी केली होती. पण वरीष्ठ नेत्यांना कंटाळून शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती दिली.

शिंदे गटात प्रवेश : अजित पवार व जयंत पाटील हे 1 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. 1 जूनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्योतीबा गुंड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्योतिबा गुंड यांनी पक्ष सोडताना पक्षातील विविध नेत्यांच्या कामकाजावर नाराजगी व्यक्त केली. राष्ट्रवादी मधील अंतर्गत वाद चहावाट्यावर आला आहे.

स्थानिक नेत्यांच्या कामकाजावर नाराजी: यापूर्वी राष्ट्रवादी मधील दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले दिलीप कोल्हे यांनी पक्ष निरीक्षक, शहर अध्यक्ष यांवर विविध आरोप करत पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला होता. आज 31 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीमधील व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी, शहर अध्यक्ष व पक्ष निरीक्षक यांवर विविध आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश कार्यक्रमात शिंदे गट शिवसेनेतील विविध नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीमधील सोलापूरचे पक्षनिरीक्षक हे सोलापूरच्या राष्ट्रवादी पक्षाकडे जातीने लक्ष देत नाहीत, असा आरोप ज्योतिबा गुंड यांनी करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

अजित पवार 1 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. जूनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्योतीबा गुंड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला.राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व पक्ष निरीक्षक यांच्या कामकाजाला कंटाळून राष्ट्रवादी सोडले. - ज्योतिबा गुंड

लाखभर खर्च करून केली नेत्यांसाठी जय्यत तयारी: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा 1 जून रोजी दौरा असल्याने पक्षातील स्थानिक नेते मोठी तयारी केली आहे. सोलापूर राष्ट्रवादी मधील व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी अजित पवार व जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.अजित पवार यांच्या दौऱ्या अगोदर पक्षाला भगदाड पडली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी संधी साधत मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम सोहळा पार पाडला.ज्योतिबा गुंड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळपास सव्वा लाख रुपयांचे हारतुरे बुकिंग केले होते .सोलापुरात शहर भर स्वागतासाठी बॅनर लावले होते.अजित पवारांना हे हार तुरे घालण्या अगोदर कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.

हेही वाचा -

  1. NCP Workers Meeting पाटणमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा रविवारी मेळावा अजितदादांची तोफ धडाडणार
  2. Ajit Pawar on Seat Allocation कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्यानेअजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य
  3. Ajit Pawar On Bjp वर्षानुवर्षे परंपरा चालु आहे त्यात जातीय तेढ निर्माण करू नका अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.