ETV Bharat / state

राष्ट्रवादीकडून सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती; दिलीप सोपल, बबनराव शिंदे यांची दांडी

राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज राष्ट्रवादीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमास अनुपस्थिती दाखवली आहे. या दोन्ही आमदारांनी मुलाखतीला दांडी मारल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीकडून सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती
author img

By

Published : Jul 26, 2019, 5:27 PM IST

सोलापूर - आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूरमधील ११ मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अजित पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि बबनराव शिंदे यांनी पक्षाच्या मुलाखतीला दांडी मारली आहे. यामुळे हे दोन्ही आमदार पक्षाला सोडचिट्टी देतील, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

राष्ट्रवादीकडून सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती; दिलीप सोपल, बबनराव शिंदे यांची दांडी

बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आमदार बबनराव शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही इच्छुकांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिंदेप्रमाणे सोपल हे सोपल शिवसेनेत जातील अशी चर्चा होत आहे.

अजित पवार यांचा बचावात्मक पवित्रा

आमदारांच्या अनुपस्थितीबाबत विचारल्यावर अजित पवार यांनी, देवदर्शन, आजारपण यामुळे दोन्ही आमदार मुलाखतीला आले नसल्याचा खुलासा केला. एकूणच मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार हे बचावात्मक पवित्र्यात असल्याचे पाहायला मिळाले. पुढे जात त्यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आता बेरजेच्या राजकारण करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Intro:सोलापूर : राष्ट्रवादीचे माढयाचे आमदार बबनराव शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली.त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. Body:कारण यात आ. बबनराव शिंदे भाजपाच्या तर आ.दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्याच्या
राजकीय वर्तुळात आहे.याबाबत विचारल्यावर अजित पवार यांनी देवदर्शन आणि आजारपण अशी कारण देत दोन्ही आमदार मुलाखतीला आले नसल्याचा खुलासा केला.तर वंचित आघाडीच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आवाहन करताना वंचित बहुजन आघाडीशी मिळतं घेण्याची भूमिका राष्ट्रवादीची असल्याचा इरादा स्पष्ट केला.दोघांनी एकत्र येण ही काळाची गरज असल्याचं म्हंटलंय...Conclusion:एकूणच आजच्या मुलाखतीच्यानिमित्ताने अजित पवार हे बचावात्मक पवित्र्यात असल्याचं पाहायला मिळालं.त्याही पुढ जात त्यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आता बेरजेच्या राजकारण करायला सुरुवात केलीय. हे आता स्पष्ट झालंय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.