सोलापूर - सांगोला विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी ही जागा मित्र पक्षाला सोडल्यामुळे साळुंखे-पाटलांनी घड्याळ हे चिन्ह वापरू नये, ही जागा मित्रपक्ष शेकापला सोडली आहे, असे जाहीर केले. त्यामुळे संतप्त साळुंखे पाटलांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा दिला.
सांगोला विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडून माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांना उमेदवारी घोषित केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ हे चिन्ह दीपक साळुंखे-पाटील यांना मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगोल्याची जागा आघाडीचे मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांना सोडली असल्याचे सांगितले. तसेच शेकापला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठींबा असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा - सोलापूर : कुमठे गावात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह
त्यामुळे साळुंखे-पाटलांना उमेदवारी मिळूनही त्यांची मोठी अडचण झाली. त्यामुळे साळुंखे पाटलांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवसेनेचे उमेदवार अॅड. शहाजी बापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. तिकीट मिळूनही ऐनवेळी राष्ट्रवादीने पाठींबा काढून घेतल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - सत्तेची लालसा असती तर कधीच पक्ष सोडला असता - प्रणिती शिंदे