सोलापूर - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला शुक्रवारी सामोरे जावे लागणार आहे. यासंबंधी पवारांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. असे असले तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये असंतोष कायम आहे. पवारांच्या विरोधात सरकारकडून सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी म्हणत आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने पंढरपूर बंदची हाक दिली आहे.
हेही वाचा - पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेने साधला 'निशाणा'
सोलापूर दौऱ्यात शरद पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर, आम्ही जेलमध्ये गेलो नाही, जे गेले त्यांनी आम्हाला शिकवू नये अशी खरमरीत टीका केली होती. त्यामुळे सूडबुद्धीने शरद पवार यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.
हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ
तसेच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवरून पवार यांना 'इतके दिवस आम्ही तुमचं ऐकलं, उद्या मात्र ऐकणार नसल्याचं म्हटले आहे.'