सोलापूर: मंत्री नारायण राणे हे सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावी आले होते. नरखेड येथील शेतकरी संतोष अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सत्कार समारंभ झाल्यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला.
राणेंची राऊतांवर टीका : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राज्यातील वातावरणाबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. राज्यात मुद्दामून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे हे संजय राऊत यांचे नेहमीच सुरूच असते. ते रोज उठून टीका करतात, असेही राणे म्हणाले.
मला उत्तर द्यायची नाहीत: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या दंगली व शरद पवार, संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरून राज्यातील इंटेलिजन्स फेल्युअर आहे अशी टीका केली होती. याबाबत प्रश्न विचारताच नारायण राणे माध्यमांवर भडकले. मी सोलापुरात आलोय. सोलापुरातील बेरोजगारी, स्थानिक प्रश्न यावर प्रश्न विचारा. शरद पवार आणि संजय राऊत या दोघांच्याही नावाला मला उत्तर द्यायची नाहीत, असे राणे म्हणाले. राज्यात तणाव निर्माण करून वातावरण गढूळ करणाऱ्या विरोधात सरकार व पोलीस तपास करून अहवाल जाहीर करेल.
ते तुमचे मार्गदर्शक असतील: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते. देशात आता मोदी विरोधात ट्रेंड सुरू आहे. त्याबाबत नारायण राणेंनी उत्तर दिले आहे. शरद पवार हे आमचे मार्गदर्शक नाहीत तुमचे असतील. ते काहीही बोलले की, त्याचा नेहमी उलट अर्थ आपण घ्यायचा. मोदी विरोधात ट्रेंड आहेत, असे म्हटले तर मागच्या वेळी 302 खासदार होते. आता 402 येतील असे नारायण राणेंनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा: