सोलापूर- महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा सोलापूर दौरा ( Nana Patole Solapur Vistit ) होता. बीड येथून हेलिकॉप्टरद्वारे ते सोलापूर येथे आले. सोलापूर विमानतळावर आल्यावर त्यांना माहिती मिळाली की, उंजल तुकाराम दासी (वय 4 वर्ष) या लहान मुलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया आहे. उपचार मुंबई येथील रुग्णालयात होणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून वेळेवर उपचार व्हावे यासाठी नाना पटोलेंनी आपले पुढील जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून हेलिकॉप्टरने संबंधित मुलीला मुंबईकडे रवाना ( Nana Patole Little Girl Heart Surgery ) केले.
मुलीच्या पालकांनी आमदार प्रणिती शिंदेना केली विनंती
उंजल तुकाराम दासी (वय 4 वर्ष,सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) या मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया होती. पण वेळेवर उपचार मिळणे आणि वेळेवर मुंबईला जाणे आवश्यक होते. तुकाराम दासी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांकडे विनंती केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी ताबडतोब नाना पटोलेंना विनंती करून आलेल्या हेलिकॉप्टरने मुलीला उपचारासाठी मुंबईकडे पाठवण्याची विनंती केली. यावर नाना पटोलेंनी ताबडतोब होकार देत मुलीला तिच्या आईवडिलांसोबत हेलिकॉप्टरने मुंबईकडे उपचारासाठी रवाना केले.
नाना पटोलेंचे सोलापुरात कौतुक
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेश अध्यक्ष यांनी हेलिकॉप्टर मार्गे उंजल दासी या चार वर्षीय मुलीला आपल्या हेलिकॉप्टरमधून उपचारासाठी पाठविले. पुढील जिल्ह्यात होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदेनी भटक्या विमुक्त जाती मेळाव्यात नाना पटोलेंचे कौतुक केले.