सोलापूर - दिवाळी म्हटले की चिमुकल्यांना वेध लागतात ते किल्ले बनविण्याचे, असाच एक पंढरीतील इतिहास प्रेमी व किल्ले बनविण्याची आवड असलेला अवलिया अमोल वाखरकर यांनी दाळे गल्ली येथे म्हैसुर पॅलेसची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. या पॅलेसवर दिव्यांची झगझगाट तसेच त्याकाळच्या राजाचे म्हैसूरचे हत्ती, पुरातन कार, तोफा, म्हैसूरचे गार्डनची हुबेहुब प्रतिकृती बनविली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी शहरवासियांची गर्दी होत आहे.
हेही वाचा... सोलापूर : दिवाळीच्या पाडव्याला तुतारी वादनाची परंपरा...
म्हैसूरमधील सर्वात मोठा सण म्हणजे दसरा आणि दसऱ्याच्या सणाला भव्य अशी रॅली व त्या रॅलीमध्ये चामुंडेश्वरी देवीची हत्तीवरुन स्वारी, तेथील राजाची रथातून स्वारी व भारताने बनविलेले चंद्रयान, भारताने केलेला बालाकोट हल्ला, तसेच मोनोरेल आणि राजांचे सैन्य रॅलीच्या रुपाने साकारण्यात आलेली आहे. ही प्रतिकृती बनविण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे.
हेही वाचा... सोलापुरात बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाची मिरवणूक
कर्नाटकच्या रुढी परंपरा आणि राजांचा पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा. तसेच शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा या प्रतिकृती साकार करण्याचा हेतू आहे, असे अमोल वाखरकर यांनी सांगितले.