ETV Bharat / state

Muslim Reservation : ...तर आमच्याकडंही 'जरांगे पाटील' आहेत; मुस्लिम आरक्षणावरून 'एमआयएम'आक्रमक - सिव्हिल चौक परिसर

Muslim Reservation : सध्या राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापलेले असताना आता मुस्लिम समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय. मुस्लिम समाजातही मनोज जरांगे पाटील आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एमआयएमचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते अन्नत्याग करून आरक्षणासाठी उपोषणाला बसतील असा इशारा यावेळी 'एमआयएम'चे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दींनी दिलाय.

Muslim Reservation
Muslim Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 10:57 AM IST

मुस्लिम आरक्षणावरून एमआयएम आक्रमक

सोलापूर : Muslim Reservation : सोलापुरातील उर्दू भवनासमोर सोलापूर शहर आणि जिल्हा एमआयएमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केलीय. मुस्लिम समाजाला आरक्षण द्या असे कोर्टाने सांगूनही मुस्लिम समाजाला न्याय मिळत नाही, त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळत नाही, अशा शब्दांत फारूक शाब्दी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा : एकीकडे राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण साठी आंदोलन होत आहेत. उपोषणं होत आहेत. राज्य सरकार त्यांची मनधरणी करत आहे. आंदोलन किंवा उपोषण आणि अन्नत्याग केल्याने जर आरक्षण मिळत असेल तर मुस्लिम समाजात सुद्धा वीर आहेत. मुस्लिम समाजातही मनोज जरांगे पाटील आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एमआयएमचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते अन्न त्याग करून मुस्लिम आरक्षणासाठी उपोषणाला बसतील असा इशारा यावेळी फारूक शाब्दींनी दिलाय.

काँग्रेस नेत्यांवर एमआयएमची सडकून टीका : एमआयएमचे नेते दौला कुमठे यांनी माध्यमांसमोर बोलताना, काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केलीय. सोलापुरात काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचे उदाहरण देत, सोलापुरातील काँग्रेलचे नेते मुस्लिम समाजासाठी झगडण्याऐवजी, नाच गाण्यात मग्न आहेत, अशा शब्दांत एमआयएम नेते दौला कुमठेंनी सडकून टीका केलीय.

काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना उर्दू भवनची स्थापना : सोलापूर शहरात सिव्हिल चौक परिसरात 2011 साली उर्दू भवनची स्थापना झाली. 2011 मध्ये महाराष्ट्र राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती. 2011 पासून या ना त्या कारणाने उर्दू भवनचे काम रखडले होते. सद्यस्थितीत सोलापूर शहरातील उर्दू भवनचे काम पूर्ण झालंय. मात्र, त्याचं उद्घाटन झालेल नाही. मुस्लिम समाजातील अनेक नेते याचा पाठपुरावा करत आहेत. सोलापूर शहरात आजही उर्दू भाषेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी उर्दू भवन मोठे उपयोगाचं ठरेल असंही सांगितलं जातंय.

आरक्षणाचा मुद्दा पेटणार : सध्या राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापलेले असताना आता मुस्लिम समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाल्याने राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याचं दिसून येतंय.

हेही वाचा :

  1. Shahu Maharaj on Reservation : आरक्षण प्रश्नी सरकारने जनतेला झुलवत ठेवू नये; छत्रपती शाहू महाराजांनी टोचले सरकारचे कान
  2. OBC March Nagpur: मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध, नागपुरात निघाला महामोर्चा
  3. DCM Devendra Fadnvis on OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.