ETV Bharat / state

अनैतिक संबंधातून लऊळ येथे एकाची हत्या; पिता पुत्राने खून केल्याची दिली कबुली - अनैतिक संबंधातून हत्या

अनैतिक संबंधातून एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील लऊळ येथे घडली होती. हत्येची ही घटना 6 मार्चला रात्री 12 वाजण्यच्या सुमारास घडली. राजाराम शिवाजी घुगे (रा. लऊळ ता. माढा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पुण्यातील एका हॉटेलमध्ये पिझ्झा पोहोचवण्याचे काम करत होता.

solapur
अनैतिक संबंधातून लऊळ येथे एकाची हत्या; पिता पुत्राने खून केल्याची दिली कबुली
author img

By

Published : Mar 14, 2020, 10:20 AM IST

सोलापूर - अनैतिक संबंधातून एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील लऊळ येथे घडली होती. हत्येची ही घटना 6 मार्चला रात्री 12 वाजण्यच्या सुमारास घडली. राजाराम शिवाजी घुगे (रा. लऊळ ता. माढा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पुण्यातील एका हॉटेलमध्ये पिझ्झा पोहचवण्याचे काम करत होता. या प्रकरणी संतोष खंडू गोरे आणि खंडू सुखदेव गोरे या आरोपी पिता-पुत्रांनी हत्येची कबुली सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांना तपासादरम्यान दिली.

अनैतिक संबंधातून लऊळ येथे एकाची हत्या; पिता पुत्राने खून केल्याची दिली कबुली

आमच्या घरातील विवाहित महिलेबरोबर राजाराम घुगे याचे अनैतिक संबंध होते. ही गोष्ट आम्हाला सातत्याने खटकत होती. त्यादिवशी देखील आमची याच कारणावरुन बाचाबाची झाली आणि आम्ही रागाच्या भरात धारदार लोखंडी कोयता, लाकडी बांबु, बॅटने राजाराम याला जीवे ठार मारल्याची कबुली आरोपी संतोष गोरे आणि खंडू गोरे या पिता-पुत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी मृत राजाराम यांचा भाऊ संभाजी घुगे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून लऊळ गावातील आरोपी संतोष आणि खंडू गोरे या पिता पुत्रावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी पथक तैनात करुन दोघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशीदरम्यान दोघा आरोपींनी राजाराम घुगे यांचा खून केल्याची कबुली दिली.

हेही वाचा - बा विठ्ठला..! पंढरीच्या चैत्र एकादशीवरही कोरोनाचे सावट

अविवाहित असलेले राजाराम घुगे आणि गोरे एकाच गावातील असल्याने त्यांची ओळख होती. राजाराम घुगेचे गोरेंच्या कुटुंबातील विवाहित महिलेशी प्रेम संबध वाढत गेले. हा प्रकार गोरे पिता पुत्रांना पटत नव्हता. या कारणावरुन 7 महिन्यापूर्वी वाद देखील झाला होता. पुण्याहुन नुकताच गावी आलेल्या राजाराम हे गोरे यांच्या घरी आले होते. मृत राजाराम यांची गोरे पिता पुत्राशी तसेच त्या महिलेशी वाद घातला. यात बाचाबाची वाढत गेली आणी गोरे पिता पुत्रानी राजारामला जीवे मारले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.