ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केल्याने सरपंचाच्या मुलाचा तलवारीने खुनी हल्ला - ग्रामपंचायत निवडणूक न्यूज

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द) यांना शिविगाळ करत हातातील तलवार डोक्यात मारल्याप्रकरणी सलगर खुर्दच्या विठ्ठल शामराव सरगर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder attack with sword in Mangalwedha taluka after oppos in Gram Panchayat elections
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केल्याने सरपंचाच्या मुलाचा तलवारीने खुनी हल्ला
author img

By

Published : Oct 27, 2020, 10:57 AM IST

पंढरपूर - ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द) यांना शिविगाळ करत हातातील तलवार डोक्यात मारल्याप्रकरणी सलगर खुर्दच्या विठ्ठल शामराव सरगर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता शामराव सरगर, विद्यमान सरपंच सुरावंती शामराव सरगर, गजेंद्र वसंत सरगर, गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा. सलगर खुर्द ता. मंगळवेढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सलगर खुर्द येथे घडली.

तुला दसरा सण बघू देत नाही...

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार ( ता. २५ ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सलगर खुर्द येथील फिर्यादीची बहिण मिराबाई धुळाप्पा करपे हिच्या घरासमोर मिराबाई करपे व भाऊसाहेब लेंगरे यांच्यामध्ये सांडपाण्याच्या कारणावरून भांडणे सुरु होती. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा तानाजी बहिण, भाचा असे समजावून सांगत असलाना सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन त्यांना शिविगाळ केली. त्याने हातातील तलवारीने तू विरोधी गटाचे काम करतो. इथे कशाला आला तुला दसरा सण बघू देत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

तलवार घेऊन केला पाठलाग...

तसेच त्याच्या सोबतच्या लोकांनी त्याच्या हातातील काठीने फिर्यादीची बहिण मिराबाई भाचा सुरेश व मुकेश यांना मारहाण केली आहे. फिर्यादीचा मुलगा तानाजी हा भांडणाची शुटींग करीत असताना दुसरा सरपंच पुत्र दत्ता शामराव सरगर याने हातात तलवार घेऊन त्याचा पाठलाग केला. दरम्यान सर्वांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरावर दगडफेक करुन फिर्यादीच्या मोटार सायकलची मोडतोड करुन नुकसान केले आहे.

हेही वाचा - कमी दराने सोनं देण्याच्या बहाण्याने लुटले... दीड लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड!

हेही वाचा - दुर्देवी..! वीजेचा धक्का लागून २६ वर्षीय वायरमनचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.