ETV Bharat / state

मंगळवेढा नगर परिषदेच्या शाळेचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवित हानी नाही

मंगळवेढा शहरातील नगरपालिका कन्या शाळा क्रमांक एकच्या शाळेत ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर नगर पालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मंगळवेढा नगर पालिकेच्या शाळेचा कोसळलेला भाग
author img

By

Published : Mar 16, 2019, 1:34 PM IST

सोलापूर - मंगळवेढा नगरपरिषदेच्या शाळेच्या पहिल्या मजल्यावरील काही भाग कोसळला आहे. सकाळी प्रार्थना सुरू असताना काही भाग कोसळल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवेढा नगरपालिकेची मुलींची शाळा क्रमांक एक ही दोन मजली इमारत असून खुप जूनी इमारत आहे. मंगळवेढा शहरात बँक ऑफ इंडियाच्या जवळ ही शाळा असून जवळपास शंभर वर्ष जुनी शाळेची इमारत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना न बसवता इतरत्र हलवावे यासंदर्भातील पत्रव्यवहार झालेला आहे. मात्र, याच ठिकाणी शाळा भरवण्यात येते शाळेची इमारत ही खूप जुनी असल्यामुळे शाळेच्या पहिल्या मजल्यावरील काही भाग कोसळला आहे.

सकाळी सात वाजता शाळेची सामूहिक प्रार्थना सुरू होती. सर्व वर्गातील विद्यार्थी हे सामूहिक प्रार्थनेसाठी बाहेर असतानाच शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भाग कोसळला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही

Intro:Body:

मायावती लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत; त्यामागे 'ही' मोठी रणनीती

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे संकेत आहेत. ज्या मतदार संघातून मायावती निवडणूक लढवत आल्या आहेत तेथून त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक त्या लढवणार नाहीत, असे चित्र आहे. तर, आपली संपूर्ण शक्ती आघाडीच्या प्रसारासाठी लावणार असल्याची चर्चा आहे.

आतापर्यंत मायावती, बिजनौर आणि आंबेडकरनगर या मतदार संघातून निवडणूक लढवत आल्या होत्या. मात्र, या जागांवर त्यांनी उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे मायावती ही निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट आहे. तर, संपूर्ण निवडणूक काळात उत्तर प्रदेशामध्ये जवळपास १२ जनसभा घेण्याची त्या तयारी करत आहेत. दरम्यान अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव आणि आघाडी केलेल्या पक्षांसाठी मायावती प्रचार करणार आहेत.

मायावती त्यांचा पक्ष आणि आघाडीसाठी एकच स्टार प्रचारक मानल्या जात आहेत. एखाद्या मतदार संघातून निवडणूक लढवल्यास त्या फक्त त्या मतदार संघापूर्ते मर्यादीत होतील. म्हणून त्यांनी हा निर्यण घेतला, असे म्हटले जात आहे. निवडणूक न लढवल्यामुळे त्या आघाडीसाठी रणनीती आखण्यास मुबलक वेळ देऊ शकणार आहेत.

मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी, सोनिया गांधी (राय बरेली) आणि राहुल गांधी (अमेठी) यांच्या जागांवर उमेदवार उभे करणार नाहीत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या उत्तर प्रदेशात त्यांनी काँग्रेससोबत आघाडीच केली आहे, असे म्हटले जात आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. या राज्यातून मोठ्या प्रमाणात जागा जिंकणारा पक्षच गेम चेंजर ठरू शकतो. भाजपला हरवण्यासाठी त्यांनी संपूर्ण लक्ष उत्तर प्रदेशात लावले आहे. तर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणासाठी त्यांनी पवन कल्याण यांच्या जन सेना या पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यामुळे तेथेही मोठी टक्कर देण्यास मायावती तयारी करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.