सोलापूर : भारतात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लाभल्या आहेत.त्यामध्ये मुंबई ते सोलापूर व मुंबई ते शिर्डी या मार्गावर धावणार आहेत.शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रेल्वे स्टेशनवरून मोदींनी हिरवा झेंडा दाखवत मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला रवाना केले. जवळपास 1 हजार 40 प्रवाशांनी यामध्ये प्रवासाचा आनंद लुटला. वाजत गाजत वंदे भारतचे स्वागत, पुणे स्टेशन, दोउंड स्टेशन, कुर्डवाडी स्टेशन आणि सोलापूर स्टेशनवर स्वागत करण्यात आले.
कुर्डवाडी रेल्वे स्थानकावरून प्रवास सुरु : सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज यांनी कुर्डवाडी रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास सुरु केला. यावेळी प्रत्येक प्रवाशाला जाऊन खासदारांनी विचारपूस केली. काही प्रवाशी हे आपल्या सहकुटुंबासह प्रवास करत होते. एका लहान बाळाला काखेत घेऊन खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी फोटो काढला. खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज यांनी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रत्येक प्रवाशाला वंदे भारत ट्रेनमधील समस्या काही आहेत का? अशी विचारणा केली. ही ट्रेन आवडली का असेही विचारले. सोलापूर ते मुंबई, सोलापूर ते पुणे आणखीन काही अशाच प्रकारचे ट्रेन एक्सप्रेस सुरू करू असे अश्वासन दिले.
गोरगरिबांसाठी देखील अत्याधुनिक ट्रेन सुरू करणार : खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी माध्यमांना महिती देताना सांगितले की, विमानात ज्याप्रमाणे अत्याधुनिक सुविधा आहेत, त्याच धर्तीवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. तिकीट दर अधिक असल्याने, गोरगरीब नागरिक यामध्ये प्रवास करू शकणार नाहीत. रेल्वे मंत्रालयाला विनंती करून गोरगरीब नागरिकांसाठी, शेतकरी वर्गासाठी अशा अत्याधुनिक रेल्वे सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा : PM Flag Off Vande Bharat Train Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा