ETV Bharat / state

Solapur News : सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग; विवाहितेने उचलले 'हे' टोकाचे पाऊल - सोलापूर क्राईम न्यूज

सासरच्या लोकांनी छळ केल्याने एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माहेरच्यांनी महिलेचे अंत्यसंस्कार पतीच्या घरासमोर करत संताप व्यक्त केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 27, 2023, 12:31 PM IST

सोलापूर - माहेरून टीव्ही आणि चार चाकी गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये आण, असा तगादा लावत विवाहित महिलेला त्रास दिला. तसेच सासऱ्याने विनयभंग केला, सासरच्या या सर्व त्रासाला व जाचास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली. संतप्त झालेल्या माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीचा मृतदेह सासरी आणून पतीच्या दारासमोर अंतिम संस्कार केले. सोलापुरातील माढा तालुक्यातील निमगाव येथील ही घटना आहे.

सुन्न करणारी घटना - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथे ही घटना घडली आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सासू, सासरा व नवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर माहेरच्या लोकांनी संतप्त होऊन सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करून संताप व्यक्त केला. प्राजक्ता रोशनकुमार चट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

पती, सासू, सासऱ्याला अटक - याप्रकरणी मृत प्राजक्ताची आई सविता दत्तात्रेय लोंढे (रा. पिंपळनेर, ता.माढा) यांनी तक्रार दिली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी पती व सासू, सासऱ्याला अटक केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.

लग्न झाल्यापासून विवाहितेवर कौटुंबिक हिंसाचार - टेंभुर्णी पोलीस ठाणे येथील पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्राजक्ताचे लग्न १५ एप्रिल २०२० रोजी निमगाव (टें) येथील रोशनकुमार चट्टे यांच्याबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर तीन वर्षांपासून पती रोशनकुमार, सासरे नारायण चट्टे व सासू कौशल्या चट्टे हे तिघे प्राजक्तास माहेरहून टीव्ही घेऊन ये, चारचाकी गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये आण म्हणून छळ करत होते. सासरच्या जाचाबाबत विवाहितेने माहेरी सांगितले होते. अनेकदा वडीलधाऱ्या व्यक्तींनी येऊन समजूत घातली होती. तरीही घरगुती हिंसाचार सुरूच होता.

सासऱ्याने सुनेचा विनयभंग केला - सासऱ्याने सुनेचा विनयभंग करून नात्याला काळिमा फसण्याचा प्रयत्न केला होता. १७ जून २०२३ रोजी सासरे नारायण चट्टे यांनी सुनेचा विनयभंग केला. यावरून झालेल्या भांडणात प्राजक्ताला संताप अनावर झाला होता. १८ जून 2023 रोजी सकाळी विवाहित महिलेने विष प्राशन केले. ही बाब माहेरच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी प्राजक्ताला अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना २६ जून रोजी प्राजक्ताचा मृत्यू झाला. प्राजक्ताच्या मृत्यूनंतर माहेरील लोकांचा संताप अनावर झाला होता. गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली होती.

पतीच्या दारातच अंतिम संस्कार - प्राजक्ताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला होता. सोमवारी दुपारी १२.३० वाजता मृतदेह निमगावमध्ये आला. मात्र, नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. सासरच्या लोकांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. सोमवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर प्राजक्ताच्या मृतदेहावर निमगाव येथे सासरी जाऊन त्यांच्या दारातच अंत्यसंस्कार करुन नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी माहेरील काही लोकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरीष जोग करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी केली अपहरण प्रकरणाची उकल; रायगडमधून तीन आरोपींना अटक
  2. Thane Crime News: दोन गुन्हेगारांचे १४ गुन्हे उघड; लाखोंचे दागिने हस्तगत
  3. UP Crime News : धक्कादायक! 'ही' आजी पाच दिवस नातवाच्या मृतदेहासोबत राहिली, दुर्गंध आल्यावर..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.