सोलापूर - कारागृहातून नुकताच जामीन मिळालेले मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्या स्वागतासाठी भरपूर गर्दी पाहायला मिळाली. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी 4 वर्षांपासून रमेश कदम हे कारागृहामध्ये होते.
हेही वाचा - राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बबनदादा शिंदेसह पंकज भुजबळांना पुन्हा संधी
न्यायालयाने विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी कदम यांना ६ ऑक्टोबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तत्पूर्वी त्यांच्या मुलीने मतदारसंघात फिरून प्रचार केला आहे. कदम हे शुक्रवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. कदम यांच्या स्वागतासाठी आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला.
हेही वाचा - राम शिंदे आव्हान नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे माझ्या पुढील आव्हान - रोहित पवार