ETV Bharat / state

सहन करायचं की पेटून उठायचं; रणजीतसिंह मोहिते पाटलांचे समर्थकांना आवाहन, भाजप प्रवेशाची चर्चा - भाजप

मोहिते पाटलांच्या अकलूज येथील बंगल्यावर आज बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

विजयसिंह मोहिते पाटील
author img

By

Published : Mar 19, 2019, 12:56 PM IST

सोलापूर - सांगा कसं करायचं, असच सहन करत रहायचं की पेटून उठायचं, हे आवाहन केले आहे राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजीतसिंह यांनी. आपल्या समर्थकांना त्यांनी आज चर्चेसाठी बोलावले आहे. रणजीतसिंह मोहिते भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप देखील त्यांना उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मोहिते पाटलांच्या अकलूज येथील बंगल्यावर आज बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. रणजीतसिंह मोहिते यांनी यासंबंधी सोशल मीडियावरून समर्थकांना आवाहन केले आहे. त्यात ते म्हणतात, 'सांगा कसं करायचं. असच सहन करत रहायचं की पेटून उठायचं. आपल्या प्रगतीसाठी, विकासासाठी, आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी.' यातून राष्ट्रवादीवरची त्यांची नाराजी त्यांनी दाखवली आहे.

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यातील युतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आजच्या बैठकीनंतर मोहिते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मोहिते पाटलांनी भाजप प्रवेश केला, तर सोलापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे आहे. दुपारी ३ वाजता मोहिते पाटील त्यांचा निर्णय कळवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:(use addistional file footage, which I sent in the midnight)

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या पेचानंतर मोहिते-पाटलांनी आता भाजपचा पर्याय निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांना फोन करून रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देत असल्याचं सांगितलंय,

Body:तर दुसरीकडे मोहिते पाटील यांनी आज अकलूजच्या शिवरत्नवर समर्थकांची बैठक बोलावली आहे.विशेष म्हणजे गटाच्या पुढील वाटचाली संदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही या निरोपात म्हंटलं आहे. दरम्यानच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील युतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा केली आहे.

Conclusion:आज दुपारी तीननंतर मोहिते-पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून राष्ट्रवादी पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.