ETV Bharat / state

पवारांनी उजनी धरणच बारामतीला न्यावे - आमदार पाटील - आमदार शहाजी पाटील

शरद पवारांनी उजनीचे पाणी नेण्यापेक्षा उजनी धरणच बारामतीला न्यावे, असा टोला सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी लावला आहे.

शहाजी पाटील
शहाजी पाटील
author img

By

Published : May 17, 2021, 9:01 PM IST

Updated : May 17, 2021, 10:31 PM IST

सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाणी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. यावरून जिल्ह्यातील शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील भाजप खासदार व आमदारांनी तीव्र आंदोलन केले होते. त्यातच आता शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवारांची सत्ता आल्यानंतर उजनीचे पाणी बारामतीला जाते, त्यापेक्षा पवारांनी धरणच बारामतीला न्यावे, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

बोलताना आमदार पाटील

उजनी पाणी बचाव समिती आक्रमक

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देत उजनीतील पाच टीएमसी पाणी देण्याची मान्य केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व भारतीय जनता पक्ष आक्रमक होत तीव्र आंदोलने केली आहेत. यातूनच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून माऊली फळांवर व दीपक भोसले यांनी जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जागर आंदोलन करत आहे. त्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या घरासमोर समितीच्यावतीने हलगीनाद आंदोलन केले.

शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास पाहिला

सांगोला तालुक्यातील महूद येथे आमदार शहाजी पाटील यांच्या घरासमोर उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे नेत्यांनी हलगी नाद आंदोलन केले. त्यावेळी आमदार पाटील यांनी राज्य सरकारने घेतलेल्या उजनीतील पाच टीएमसी पाण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना आमदार शहाजी पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ज्या वेळी राज्यात सत्ता आली आहे. त्यावेळी फक्त बारामती तालुक्याचा विकास झाल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळी पवार यांची राज्यात सत्ता येते त्यावेळी उजनीचे पाणी बारामतीला दिले जाते. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते वसंतराव नाईक यांच्यापर्यंत सर्वांनी राज्याचा विकास पाहिला. मात्र, शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास पाहिल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.

...तर धरणच बारामतीला घेऊन जावे

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी हे जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी व बारामती शहराच्या पाणीप्रश्‍नासाठी उजनीतील पाणी नेले आहे. त्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे बारामतीला घेऊन जावे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात राजकारण तापले आहे. यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेच्या आमदारांनी विकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा - माढ्यात १५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडावर कुऱ्हाड; गु्न्हा दाखल

Last Updated : May 17, 2021, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.