ETV Bharat / state

'मिशन हॅट्ट्रीक'साठी आमदार प्रणितींचा झंझावात प्रचार

author img

By

Published : Oct 17, 2019, 12:47 PM IST

Updated : Oct 17, 2019, 2:00 PM IST

काल (बुधवार) त्यांचा चालक नसल्याने त्या स्वतः गाडी चालवत मतदारांपर्यंत पोहोचल्या. यंदा तिसऱ्यावेळी आ. प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या मैदानात उतल्या आहेत.

आ. प्रणिती शिंदे

सोलापूर - आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुपारच्या कॉर्नर सभा, रात्रीच्या जाहीर सभांबरोबरच मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहचण्याचा फंडा अवलंबला आहे. कोणत्याही परिस्थितीत जनसंपर्क न सोडण्याचा जणू चंगच बांधला आहे. काल (बुधवार) त्यांचा चालक नसल्याने त्या स्वतः गाडी चालवत मतदारांपर्यंत पोहोचल्या. यंदा तिसऱ्यावेळी आ. प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या मैदानात उतल्या आहेत.

सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातील लढत ही चुरशीची ठरणार आहे. कारण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळचे आणि मूळचे काँग्रेसचे असलेले नेतेच आज आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. 2014 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महापालिकेचे विरोधीपक्ष नेते महेश कोठे यांनी सेनेकडून निवडणूक लढविली होती. मात्र, यंदा सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी सेने प्रवेश करत मध्यमधून रिंगणात उतरले आहेत. नाराज कोठे हे सेनेशी बंड करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सोलापुरातील काही मुस्लीम तरुण हे मूळचे काँग्रेसचे तौफीक शेख यांना पाठिंबा देत एमआयएमकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या फारूक शाब्दी यांच्या पाठिशी उभे आहेत. त्याचबरोबर सोलापुरातील कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देणारे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम हे देखील मध्यमधून निवडणूक लढवित आहेत.

हेही वाचा - मतदारसंघ बदलणाऱ्यांना प्रणितींचा टोला, म्हणाल्या 'मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है'

त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी तिसऱ्यांदा निवडूण येण्यासाठी पूर्ण जोर लावत मतदार संघ पिंजून काढत आहेत. दिवस-रात्र मतदारांशी संपर्क करत आहेत. 2014 च्या निवडणूकीत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच दोघांनी बंडखोरी करत महेश कोठे यांनी सेनेकडून तर तौफिक शेख यांनी एमआयएमकडून चांगला लढा दिला होता. मात्र, यंदा महेश कोठे (अपक्ष), दिलीप माने (शिवसेना), तौफिक शेख हे तुरूंगात असल्याने त्यांनी फारूक शेख (एमआयएम) यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - भाजपच्या अंहकारी नेतृत्वाकडे मुळप्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची किमया - शत्रुघ्न सिन्हा

प्रणिती शिंदे यांनी 2014 ला लढा देत 'मिशन व्हिक्टरी' यशस्वी केला होता. यावेळी 'मिशन हॅट्ट्रीक' यशस्वी होणार का हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

Intro:
(लै भारी साठी)
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुपारच्या कॉर्नर सभा,रात्रीच्या जाहीर सभांबरोबरच भल्या सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहचण्याचा फंडा अवलंबलाय....कोणत्याही परिस्थितीत जनसंपर्क न सोडण्याचा जणू चंगच बांधलाय...Body:ड्रायव्हर आला नाही तर बाई थेट स्वतः गाडी चालवत लोकंपर्यंत पोहचतायत... कधी टपरीवर चहा पितात, कधी मैदानांवर युवा मतदारांना भेटतात... अन आपल्यालाचं निवडून देण्याचं आवाहन करतात....पुरुष प्रतिस्पर्ध्यांशी सामना करणाऱ्या प्रणिती यांचा हा झपाटा पाहुन एका जेष्ठांन आपण एकट्याच फिरताय मग बाकी तुमच्या महिला कार्यकर्त्या कुठं आहेत असा सवाल केला त्यावर त्यांनी ...'एक नारी सबको भारी' असं उत्तर दिलंय. Conclusion:आ.प्रणिती शिंदे यांची प्रचारातली आघाडी पाहता सुशीलकुमारांची कन्या म्हणून घराणेशाही असली तरी एक नेतृत्व घडतंय अन विरोधकांना नडतंय अशीच चर्चा सोलापुरात सुरु झालीय...
Last Updated : Oct 17, 2019, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.