सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे ( Praniti Shinde on Sanvidhan ) आणि केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदींमुळे संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. ( Praniti Shinde Criticize PM Modi and Bjp ) सोलापूर शहरातील पार्क चौक येथे संविधान भवनचे उद्घाटन झाले. ( Sanvidhan Bhawan Park Chawk Inaugration ) यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका करत नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
जनतेला लोकशाही टिकवावी लागेल -
भारतात आता लोकशाही धोक्यात आली आहे. जात पात करणाऱ्या मोदी किंवा भाजप सरकारने एक खतरा निर्माण केला आहे. देशाची लोकशाही टिकवावी असेल तर तरुणांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथी पर्यंत मर्यादित न राहता शेवटपर्यंत लढून ही लोकशाही टिकवावी लागेल. आता राज्यकर्ते काहीही करू शकणार नाहीत, जनताच यांना जागा दाखवून देईल, असा विश्वास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - NCP Allegation PM Modi : मोदींनी आपल्या पदाचा मान राखला नाही, राष्ट्रवादीची पंतप्रधानावर टीका
शहरातील मुख्य चौकात संविधान भवन उभारणार -
सोलापूर शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या पार्क चौक येथे संविधान भवन साकारणार आहे. पालकमंत्री दत्ता भरणे, आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते याचे भूमीपूजन झाले. या कार्यक्रमासाठी बहुजन समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही नेत्यांनी श्रेय घेण्यासाठी या कार्यक्रमाला विरोध केला होता. मात्र, याठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला.