ETV Bharat / state

सैन्यात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरे; टवाळखोरांचा छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या - minor girl harassment in pandharpur

पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही बाब त्या मुलीने लिहलेल्या चिट्टीमधून समोर आली. तेव्हा पोलिसांनी त्या तरुणांना अटक केली आहे.

minor girl suicide in pandharpur due to harassment
सैनिक जाण्याचे स्वप्न राहिले अधुरे; टवाळखोरांचा छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
author img

By

Published : Dec 13, 2020, 3:33 PM IST

पंढरपूर - तालुक्यातील शेळवे गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 6 डिसेंबर रोजी मुलीने आत्महत्या केली होती. याची नोंद पंढरपूर पोलिसांनी आकस्मिक निधन म्हणून केली होती. मात्र 9 डिसेंबर रोजी तिच्या शाळेच्या वही तपासली असता त्यात लाल पेनने लिहिलेले अर्धे पानाची चिठ्ठी मिळून आली. त्या चिठ्ठीत मुलीने लहू परमेश्वर गाजरे, स्वप्नील कांतीलाल कौलगे व रमेश निवृत्ती गाजरे (सर्व रा. शेळवे, ता. पंढरपूर) यांनी छेडछाड केल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.

अभ्यास खोलीमध्ये केली आत्महत्या
पीडित मुलगी ही इयत्ता 11 वी मध्ये शिकत होती. ती दररोज मोटार सायकलवरून कॉलेजला येऊन जाऊन करत होती. सध्या लॉकडाऊन लागल्यामुळे ती घरीच ऑनलाइन शिक्षण घेत होती. 6 डिसेंबर रोजी मुलीने राहत्या घरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांनी 9 डिसेंबर रोजी मृत मुलीच्या वडिलांनी तिच्या शाळेची बॅग तपासली असता त्यात चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत तिने आत्महत्येचे कारण लिहिले आहे. त्यात तिने तीन संशयित छेडछाड केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर परमेश्वर गाजरे यांनी याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

'तिरंगा आणि आर्मी माझ्या नशिबात नाही, हे भारत माता मला माफ कर'
किती सहन करू मी मला आता अजिबात सहन होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेने हात धरुन केलेली छेडछाड केली ही बाब कोणाला सांगितल्यास जीव मारणार, अशी धमकी दिली. ही धमकी मला सहन होत नाही. लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवून दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा. या पोरांना घेवून नाचायचा. सगळे जण मला नववी पासूनच चिडवायची. जाता–येता त्यांच्या नजरेचा मला लय त्रास व्हायचा. आजपर्यंत सहन केलं पण आता सहन होत नाही. म्हणून मी आज माझं जीवन संपवतेय. हे भारत माते मला माफ कर, आई-बापू मला माफ करा आत्महत्या करणे गुन्हा आहे. तरी सुद्धा मी करतेय" असा मजकूर मुलीने चिठ्ठीत लिहिला आहे.

तिघांवर गुन्हा दाखल करून अटक
फिर्याद दाखल करून घेण्याबात उशीर झाल्याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याकडे विचारणा केली असता, सदर मुलीने आत्महत्या कारण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट ही एका बॅगमध्ये ठेवलेली आढळली आहे. त्यानंतर सदर मुलीच्या पित्याने संपर्क करून आम्हाला याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - महामार्गावर हजारो एकर शेतजमिनीचे भूसंपादन; मोबदला मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना

हेही वाचा - सोलापूरकरांनो वेगात जाल तर, इंटरसेप्टरद्वारे होणार कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.