ETV Bharat / state

सुभाष देशमुखांनी घेतली नारायण पाटलांची भेट, माढ्यातून पवार विरुद्ध देशमुख 'सामना'? - PATIL

माढा मतदारसंघातून लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुकांची चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध देशमुख असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

सुभाष देशमुख आणि नारायण पाटील
author img

By

Published : Mar 8, 2019, 11:54 PM IST

सोलापूर - माढा मतदारसंघातून लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुकांची चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध देशमुख असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख यांनी करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार नारायण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माढा मतदारसंघाबद्दल कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सुभाष देशमुख म्हणाले, की मागील साडेचार वर्षात मोदी सरकारने गरीब श्रीमंतांची दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यानांच नोटबंदीचा त्रास झाला आहे. मोदी सरकारने ज्या योजना राबवल्या त्याचा सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. आपला देश सुरक्षीत ठेवायचा असेल तर परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायला हवे असे आवाहनही यावेळी देशमुखांनी केले.

सुभाष देशमुखांनी घेतली नारायण पाटीलांची भेट

आमदार नारायण पाटील म्हणाले, की १९९८ पासून सुभाष देशमुख यांचा व माझा परिचय आहे. आमच्या मनामध्ये पूर्वीपासूनच देशमुख यांच्याबद्दल आदर असल्याचे नारायण पाटील म्हणाले. उजनी धरणाच्या शेजारी असलेल्या तालुक्यात १० तास लाईट चालते. तर करमाळा तालुक्यात मात्र ६ तासच वीज चालते. ऐन उन्हाळ्यात तर फक्त चारच तास वीजपूरवठा केला जातो. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर पून्हा ५ तास वीजपूरवठा केला जातो. आमची विजेच्या जाचातून सूटका करा अशी मागणी यावेळी नारायण पाटील यांनी केली.

माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात सुभाष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना २ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळेच पुन्हा एकदा सुभाष देशमुखांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Intro:R_MH_SOL_02_08_DESHMUKH_IN_MADHA_S_PAWAR
सुभाष देशमुखाची माढ्यातून लोकसभेसाठी चाचपणी,
आमदार नारायण पाटील आणि सुभाष देशमुखांची झाली बैठक
सोलापूर-
माढा लोकसभा निवडणूक व पुर्वतयारीच्या उद्देशाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी करमाळयाचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांची भेट घेऊन माढा लोकसभेविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे.
Body:लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आहे. माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून सूभाष देशमुख यांच्या नावावर भाजपाकडून शिक्कामोर्तब झाले असल्यामूळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माढात बैठकी घ्यायला सुरूवात केली आहे.
यावेळी बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले की 1998 सालापासून सुभाष बापू चा व माझा परिचय आहे. माझ्या कामाची व शब्दाची कल्पना आहे. आम्ही तुमच्यापाशी येऊन गुणगाण जरी केले नसले तरीसुद्धा आमच्या मनामध्ये पूर्वीपासूनच आदर असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले. उजनी धरणाच्या शेजारच्या तालुक्यात दहा तास लाईट चालते तर करमाळा तालूक्यात मात्र सहा तासांच वीज चालते नंतर ऐन उन्हाळ्यात तर फक्त चारच तास वीजपूरवठा केला जातो. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर पून्हा 5 तास वीजपूरवठा केला जातो. तरी आमची विजेच्या जाचातून सूटका करा अशी मागणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी यावेळी केली.
बाईट - 1 - नारायण पाटील ( शिवसेना आमदार करमाळा -माढा मतदारसंघ )
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मागील साडेचार वर्षात मोदी सरकारने गरीब श्रीमंतांची दरी कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत नोटबंदीचा त्रास झाला आहे तो ज्यांच्याकडे जास्त पैसा होता त्यांना याचा त्रास झाल्याचे देशमुख यांना सांगितले. मोदी सरकारने ज्या योजना राबविला त्याचा सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल तर परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायला हवे असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
बाईट - 2 - सुभाष देशमुख ( सहकारमंत्री )
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणूकीत माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या विरोधात सुभाष देशमुख यांनी निवडणूक लढवीली होती. त्यावेळी 2 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन देशमुखांनी सर्वानाच धक्का दिला होता. त्यामुळेच पून्हा एकदा सूभाष देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून देशमुख ही माढ्यात चाचपणी करत आहेत.
यावेळी शहाजी पवार, गणेश चिवटे, सुनिल तळेकर, विठ्ठलराव भणगे, संतोष पाटील, किरण बोकन, संजय तनपुरे, जयप्रकाश बिले, दीपक चव्हाण, दादा पाटील, अमोल पवार, जयंत काळे आदि मान्यवर उपस्थित होते.Conclusion:नोट- R_MH_SOL_02_08_DESHMUKH_IN_MADHA_S_PAWAR
या फाईल नेमने बाईट आणि व्हीडीओ सोबत जोडले आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.