ETV Bharat / state

आधी मजुरांना रेल्वे स्टेशनवर बोलवले; नंतर दिले हाकलून, सोलापुरात प्रशासनाचा सावळा-गोंधळ

author img

By

Published : May 13, 2020, 5:35 PM IST

Updated : May 13, 2020, 7:11 PM IST

सोमवारी संध्याकाळी ऑनलाईन अर्ज केलेल्या मजुरांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून मेसेज आला की, उद्या सकाळी तुम्हाला उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाडी आहे. सकाळी 10 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे सूटणार आहे. असे मेसेज नोंदणी केलेल्या सर्वांना आल्यामुळे हे मजूर सकाळी-सकाळी रेल्वे स्टेशनवर हजर झाले.

Solapur
सोलापूर

सोलापूर - उत्तर भारतात जाण्यासाठी मंगळवारी सकाळी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून रेल्वे सूटणार आहे, असा मेसेज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून अनेकजणांना आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून मेसेज आल्यामुळे ज्यांनी-ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, असे कामगार सोलापूर रेल्वे स्टेशनवर जमा झाले. मात्र, सोलापुरातून कोणतीही रेल्वे जाणार नसल्याचे सांगत पोलिसांनी या जमलेल्या कामगारांना हाकलून दिले. त्यामुळे सोलापूर प्रशासनाचा या घटनेमुळे सावळा-गोंधळ समोर आला आहे.

सोलापुरात प्रशासनाचा सावळा-गोंधळ

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजारो मजूर अडकून पडलेले आहेत. या मजुरांनी त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील केले आहेत. सोमवारी संध्याकाळी ऑनलाईन अर्ज केलेल्या मजुरांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून मेसेज आला की, उद्या सकाळी तुम्हाला उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाडी आहे. सकाळी 10 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे सूटणार आहे. असे मेसेज नोंदणी केलेल्या सर्वांना आल्यामुळे हे मजूर सकाळी-सकाळी रेल्वे स्टेशनवर हजर झाले.

त्यावेळी पाहता-पाहता 300 ते 400 मजूर हे रेल्वे स्टेशनवर एकत्र जमले. त्यानंतर यावेळी पोलिसांनी आज कोणतीही रेल्वे जाणार नसल्याचे सांगत मजुरांना हाकलून लावले. दरम्यान, गावाकडे जायला मिळणार असल्यामुळे या मजुरांना त्यांनी भाड्याने घेतलेल्या रूम सोडलेल्या आहेत. त्यामुळे आता परत आम्ही रूमवर जाऊ शकत नाहीत, असे या मजुरांनी सांगितले. तर जिल्हाधिकारी कार्यालयातूनच फोन आलेला असल्यामुळे आम्ही इकडे आलो असल्याचे या मजुरांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयांशी संपर्क केला असता, या मजुरांना कोणी फोन केला आहे, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे इतर राज्यातील मजुरांच्या घरचे लोक चिंचेत आहेत. त्यामुळे या मजुरांना तूम्ही पायी चालत या, असे देखील त्यांचे कुटुंबीय सांगत असल्याचे या मजुरांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता अनेकजण हे त्यांच्या राज्यात जाण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करत जाण्यासासाठी निघाले आहेत.

Last Updated : May 13, 2020, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.