ETV Bharat / state

संसार अन् मुलांना सोबत घेत सोलापूरहून ते पायी निघाले छत्तीसगडला - सोलापूर ते छत्तीसगड पायी प्रवास

कोरोनाच्या पार्श्वभूमी सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची उपासमार होत आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपले घर गाठण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. असेच दोन जोडपे आपल्या मुलांसह आणि संसारासह पायी छत्तीसगडला निघाले आहेत.

edited photo
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 11, 2020, 9:18 PM IST

सोलापूर - पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडमधून काम करण्यासाठी सोलापुरात आलेल्या मजुरांचा संयम सुटला आहे. त्यामुळे या परप्रांतीय मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अख्खा संसार डोक्यावर आणि लहान मूल कंबरेवर घेऊन ही जोडपी शेकडो किलोमीटर पायी जायला निघाली आहेत. 40 अंशाहून अधिक तापनातही मजूर पायी चालत असताना यांची ही हाल अपेष्टा कोणालाच दिसत नाहीत हे मोठे दुर्दैव आहे.

संसार अन् मुलांना सोबत घेत सोलापूरहून ते पायी निघाले छत्तीसगडला
छत्तीसगड राज्यातून सोलापुरात बांधकामावर मोलमजुरी करायला आलेले ही जोडपी आता पायी चालत छत्तीसगडच्या दिशेने निघाले आहेत मागील पन्नास दिवसांपासून हे मजूर सोलापुरात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करत हे सोलापुरातच थांबले होते. आपल्या गावाकडे जाण्यासाठी एखाद्या रेल्वेची सोय प्रशासनाकडून केली जाईल, या आशेने त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्रही मिळविला होता. पण, रेल्वे कधी सुरु होणार याबाबत काहीच कल्पना नाही. त्यात काम बंद असल्याने दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत सुरु झाली. त्यामुळे अखेर या मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात हे मजुरवर्ग मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाढा ओढत होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरु झाली. साठवलेल्या पैशातून कसेबसे पन्नास दिवस निघाले. जवळचे अन्न व पैसे संपत आले. त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांधही सुटला. संसारोपयोगी साहित्याचे गाठोडे डोक्यावर तर लहान मुलं कधी चालत तर कधी कमरेवर, असा पायी प्रवास सुरु झाला आहे. काहीही झाले तरी आपले गाव गाठणार या निर्धाराने या मजुरांनी छत्तीसगडच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

हेही वाचा - विठ्ठल रुख्मिणीच्या गाभाऱ्यास ३१०० हापूस आंब्याची आरास; विठ्ठल मंदिराला आले आमराईचे रूप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.