सोलापूर - येथील नई जिंदगी परिसरात असलेल्या प्लास्टिक भांगर गोडाउनला भीषण आग लागली. यावेळी धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. अग्निशमन दलाच्या दहा बंबाकडून ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती ही आधिकाऱ्यांनी दिली. या आगीत लाखोंचे भंगार जळून खाक झाले आहे.
दहा बंबाच्या साह्याने आग आटोक्यात -
नई जिंदगी परिसरात अजीम खान यांचे भंगार व्यासायिकाचे गोडाउन आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते भंगार प्लास्टिक साहित्य खरेदी विक्रीचे व्यवसाय करतात. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या गोडाउनला अचानक आग लागली. गोडाउन मालक खान व नागरिकांनी पाण्याचा टाकून आग विझवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग आटोक्यात न येता वाढत चालल्याने शेवटी अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. सुरुवातीला एका गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाबाहेर गेल्याने आणखी दहा बंबाना बोलवण्यात आले. या बंबाच्यासाह्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सुदैवाने कोणत्याही जीवितहानी नाही -
अजीम खान यांच्या गोडाउनला आग लागून लाखोंचे भंगार प्लास्टिक साहित्य जळून राख झाले आहे. रात्रीच्या सुमारास आग लागली होती. त्यामुळे गोडाउनमध्ये एकही कामगार कामाला उपस्थित नव्हता. त्यामुळे सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नाही.