सोलापूर Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाची धग वाढली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार सकाळपासून मराठा समाज बांधवानी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), रामदास कदम (Ramdas Kadam) हे मराठा समाजातील गद्दार असल्याचा आरोप, यावेळी सोलापुरात मराठा बांधवांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावात राजकीय नेत्यांना व मंत्र्याना गावबंदी केल्याची माहिती, सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत जालन्याहून आदेश येत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
प्रशासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू : जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यानी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून अंतरवली सराटी येथे 17 दिवस उपोषण केले. सरकारने 30 दिवसात आरक्षण देतो असे सांगून उपोषण मागे घेण्यास लावले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आणखीन 10 दिवस निर्णय देण्यासाठी सरकारला वाढवून दिले. ती मुदत 25 तारखेला संपते. जर सरकारने आरक्षण दिले नाही तर 25 तारखेपासून पुढील आदेश येइपर्यंत मराठा समाजाचे तालुका, जिल्हापरिषद गटातील मोठे गाव, तहसील ऑफिस समोर, zp समोर मराठा बांधवांनी साखळी उपोषण करावे असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून जाहीर केला होता.
दीडशेहून अधिक गावात नेत्यांना व मंत्र्याना प्रवेश बंदी : जरांगे पाटील यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा एकवटला आहे. जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी 25 ऑक्टोबरपासून पुढील आदेश येइपर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. गावपातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना (आमदार, खासदार, मंत्री) यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना गावात कोणतेही कार्यक्रम घेवू देऊ नका. असे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे हून अधिक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा -
- Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील सभेपूर्वी शिवनेरी किल्ल्यावर; शिवाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं दर्शन
- Maratha Youth Suicide : मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ
- Maratha Reservation Protest : एकच मिशन, मराठा आरक्षण.. आरक्षण जालन्यातील 245 गावांत राजकीय पुढाऱ्यांना 'गावबंदी'