ETV Bharat / state

मराठा आरक्षण : तिऱ्हे येथे सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर आंदोलन - maratha kranti morcha

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणापूर्वी कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये, आरक्षणासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक भागात रास्तारोको, रॅली आणि बंद पाळून आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार उत्तर तालुक्यातील तिऱ्हे गावातही सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
author img

By

Published : Sep 21, 2020, 12:45 PM IST

सोलापूर - मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठविण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात ठीकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली असता, तिऱ्हे येथे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणापूर्वी कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये, आरक्षणासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक भागात रास्तारोको, रॅली आणि बंद पाळून आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार उत्तर तालुक्यातील तिऱ्हे गावातही सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी तिऱ्हे आणि आसपासच्या गावातील मराठा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर ठिय्या दिला. यावेळी ग्रामस्थांनी मराठा समाजाला पूर्ववत आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. राज्य सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात पूणर्रविचार याचिका दाखल करून आरक्षणावरची स्थगिती उठवावी अशी मागणी केली.

यावेळी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी राम जाधव, नवनाथ सुरवसे, संदिप सुरवसे, घनशाम पाटील आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच सोलापूर जिल्हा बंदला उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. त्यानंतर आरक्षणाचे निवेदन देऊन हे आंदोलन थांबविण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.