पंढरपूर (सोलापूर) - करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे ( Makai Sahakari Sakhar Karkhana ) अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली. ( Swabhimani Shetkari Sanghatana ) याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नेते सचिन पाटील यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय रणदवे हे थकित वीज बिलासंदर्भात बोलणी करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मकाई कारखान्यावर गेले होते. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याच वेळी दिग्विजय बागल यांनी विजय रणदिवे यांना मारहाण केली. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा - राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळीही हे सरकार कलम 144 लावणार का..? - ओवैसी
दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल -
तर याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. चेअरमन दिग्विजय बागल यांना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिला.