ETV Bharat / state

भेटी लागी जीवा : दिंड्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ; वाहतुकीत बदल - pandharpur latest news

पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या माघ वारी बारा फेब्रुवारी रोजी ( maghi yatra Pandharpur ) भरणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून विठुरायाच्या भेटीसाठी संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ( Dindya Palkhi on the way to Pandharpur ) केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर कडे येणाऱ्या मार्गांमध्ये 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत मोठे बदल ( Changes in transportation at pandharpur ) केले आहेत.

maghi yatra news
दिंड्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
author img

By

Published : Feb 8, 2022, 12:45 PM IST

पंढरपूर - पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येने माघी वारीला येत असतात. यावर्षी माघवारी बारा फेब्रुवारी रोजी ( maghi yatra Pandharpur ) भरणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून विठुरायाच्या भेटीसाठी संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ( Dindya Palkhi on the way to Pandharpur ) केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर कडे येणाऱ्या मार्गांमध्ये 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत मोठे बदल केले ( Changes in transportation at pandharpur ) आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर माघ वारी निमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक येणार आहेत प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

वाहतूक दुसर्‍या दिशेने वळवण्यात आली -

पांडुरंगाच्या प्रमुख वाऱ्यांपैकी एक असलेली महत्त्वाची वारी म्हणून माघवारी कडे पाहिले जाते. या वारीत राज्यासह परराज्यातून वारकरी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. पंढरपूरच्या दिशेने येणार वाहतूक दुसर्‍या दिशेने वळवण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान पंढरपूर शहरातील एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.

वाहतुकीत बदल -

पंढरपूर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवरून माघ वारीमध्ये जड वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जड वाहनांची वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. हे वाहतूक 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. पंढरपुरातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाड्याच्या दिशेने जाणारी जड वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे तसेच राज्याच्या विविध भागातून दिंडी व पालखी सह चालत पंढरपूरच्या दिशेने येत आहेत.

हेही वाचा - Supriya Sule Attack on PM : मी पंतप्रधान मोदींवर नाराज नाही, मी हैराण आहे - सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.