ETV Bharat / state

लोकमंगल साहित्य पुरस्काराचे 'हे' आहेत यंदाचे मानकरी

गेल्या चार वर्षांपासून लोकमंगल वाचनालयाकडून राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न होणार आहे.

award
लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी
author img

By

Published : Dec 5, 2019, 7:58 AM IST

Updated : Dec 18, 2019, 10:44 AM IST

सोलापूर - लोकमंगल सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. द. तु. पाटील यांना 'चैत' कादंबरीसाठी, शर्मिला फडके यांना 'फोर सिझन्स' कादंबरीसाठी तर विश्राम गुप्ते यांना 'लेखकाची गोष्ट' या ललित लेखनासाठी हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. याशिवाय, मराठी भाषा संशोधन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांनादेखील हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन केले आहे.

गेल्या चार वर्षांपासून लोकमंगल वाचनालयाकडून राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न होणार आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना यंदाचा 'तन्वीर सन्मान पुरस्कार' जाहीर

यापूर्वी, लोकमंगल पुरस्कार मिळाललेल्या अनेक पुस्तकांना नंतर शासकीय आणि इतर पुरस्कार मिळाले आहेत. नंदा खरे, सुहास बहुळकर, सुधीर रसाळ, आनंद कुंभार, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुख, सई परांजपे, गोपाळराव देशमुख, मकरंद साठे, गणेश मतकरी, मंगेश काळे, राजीव नाईक, ऋषिकेश गुप्ते, प्रफुल्ल शिलेदार हे यापूर्वी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या विचारांचा आनंद घ्यावा, असे आवाहन लोकमंगल समूहाचे संस्थापक आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मराठी साहित्य रसिकांना केले आहे.

Intro:सोलापूर : लोकमंगल सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज सोलापुरात करण्यात आली.यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कार २०१९चे मानकरी आहेत.

१) चैत - कादंबरी - द. तु. पाटील - मौज प्रकाशन - बेळगाव

२) फोर सिझन्स - कादंबरी - शर्मिला फड़के -मेहता पब्लिशिंग हाऊस-मुंबई

३). लेखकाची गोष्ट - ललित - विश्राम गुप्ते - देशमुख आणि कंपनी- गोवा

४) डॉ. प्रदीप कर्णिक - संचालक, मराठी भाषा संशोधन मंडळ - मुंबई
संपादक - मराठी संशोधन पत्रिका
Body:गेल्या चार वर्षापासून लोकमंगल वाचनालयाकडून राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्करांचं यंदाचं हे पाचवं वर्ष आहे.यंदाचा पुरस्कार सोहळा १४ डिसेंबर, २०१९ रोजी संध्या.६ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे संपन्न होणार आहे.
Conclusion:विशेष म्हणजे लोकमंगल पुरस्कार मिळाललेल्या अनेक पुस्तकांना पुढे शासकीय आणि इतर पुरस्कार मिळाले आहेत.यापूर्वी हा पुरस्कार- नंदा खरे, सुहास बहुळकर, सुधीर रसाळ, आनंद कुंभार, प्रवीण बांदेकर,श्रीकांत देशमुख, सई परांजपे, गोपाळराव देशमुख,मकरंद साठे, गणेश मतकरी, मंगेश काळे, राजीव नाईक, ऋषिकेश गुप्ते,प्रफुल्ल शिलेदार यांना देण्यात आलेला आहे.या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या विचाराचा आनंद घ्यावा असे आत्मिय निमंत्रण लोकमंगल समूहाचे संस्थापक आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मराठी सारस्वतांना दिले आहे.

Last Updated : Dec 18, 2019, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.