ETV Bharat / state

भविष्यात मतदानाचा हक्क काढून घेतला जाण्याची आमदार प्रणिती शिंदेंनी यांना भीती - मतदानाचा हक्क काढून घेतला जाईल

Lok Sabha Election 2024 : लोकसभेची 2024 ची निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक असेल. तसंच भविष्यात मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल, अशी भीती काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी (22 डिसेंबर) सोलापुरात बोलून दाखवली.

congress MLA praniti shinde expressed fear that the right to vote will also be taken away in the future
'भविष्यात मतदानाचा हक्क काढून घेतला जाईल', आमदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली भीती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 10:26 AM IST

सोलापूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाविरोधात 'इंडिया' आघाडीच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर शुक्रवारी (22 डिसेंबर) जाहीर निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकार विरोधात सडकून टीका केली. "आगामी काळात लोकसभेची 2024 ची निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक असेल. तसंच भविष्यात केंद्र सरकारकडून मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल," असा दावा त्यांनी केला.

'इंडिया' आघाडीचा एकच शत्रू : पुढं त्या म्हणाल्या की, "देशातील 'इंडिया' आघाडीचा आता एकच शत्रू आहे तो म्हणजे 'भारतीय जनता पार्टी'. कोणतंही आव्हान येऊ देत. आपण एकत्र येऊन लढायचं. एकत्र लढलो तरच देशातील लोकशाही जिवंत राहील. देशातील लोकांना आता पर्याय हवा असून सर्व समाज घटक त्रस्त आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक मोर्चे काढण्यात आले. तसंच 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून वाड्यावर तांड्यावर जाऊ," असंही आवाहन प्रणिती शिंदे यांनी केलं.

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून मोदींना घेरलं : संसदेतल्या घुसखोरीचं प्रकरण ताजं असतानाच काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात अतिरेक्यांनी भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यावरुनच प्रणिती शिंदे यांनी, दहशतवादी हल्ल्यांमध्ये अथवा नक्षलवादी हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना पंतप्रधानांनी कधी श्रद्धांजही वाहिली आहे का? मोदी नेहमी विमानात बसून आकाशातून टाटा-बायबाय करताना दिसतात. पण ते कोणाला टाटा करतात ते कधी आम्हाला समजलंच नाही. असा टोलाही हाणला.

दरम्यान, या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा -

  1. Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या मतदारसंघातील गाठी भेटी स्वतःसाठी नव्हे तर मुलीसाठी... शिंदेंची स्पष्टोक्ती
  2. Praniti Shinde Loksabha : काँग्रेसचा मोठा निर्णय! सोलापूर लोकसभेची उमेदवारी प्रणिती शिंदे यांनाच द्यावी
  3. Solapur News : प्रणिती शिंदेंचे भाजपला खुले आव्हान, चिमणी तर पाडली, आता सहा महिन्यांत विमानसेवा सुरू करून दाखवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.