ETV Bharat / state

सोलापुरात चोरट्याकडून चार लाखांचे सोने हस्तगत

author img

By

Published : Oct 30, 2020, 7:16 AM IST

अतिवृष्टीमुळे सुरज रावजी कापसे (वय 29) हे घराला कुलूप लावून दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातील 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

seized four lakh gold from the thief
चोरट्याकडून चार लाखांचे सोने जप्त केले

सोलापूर- ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी घरफोडी उघडकीस आणली आहे. अतिवृष्टीमुळे सुरज रावजी कापसे (वय 29) हे घराला कुलूप लावून दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातील 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याचा छडा लावून स्थानिक गुन्हे शाखेने शंभर टक्के रिकव्हरी केली आहे.

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात 14 व 15 ऑक्टोबर रोजी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांना आपली घर सोडून जीव वाचवण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागले होते. याच दरम्यान सुरज कापसे यांनी देखील अतिवृष्टीमुळे आपले राहते घर सोडून 15 ते 17 ऑक्टोबर रोजी दुसरीकडे राहण्यास गेले होते. त्यामुळे बंद घराचा फायदा उचलून चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या चोरीची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

हेही वाचा- बीड : २५ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्यास रंगेहात पकडले

चोरट्यांकडुन 14 तोळे सोने हस्तगत

स्थनिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत तपास सुरू केला. मनगोळी येथील चोरी केलेलं संशयित चोरटे सोने विकण्यासाठी पुणे येथे जाणार आहेत. तिघे चोरटे सोलापूर शहरातील जुना पुणे नाका येथे थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. तीन संशयित चोरट्यास अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अतिवृष्टीत मनगोळी येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या तिन्ही संशयित चोरट्यांकडुन 14 तोळे सोने हस्तगत केले आहे. पोलिसानी यामध्ये बाळू औदुंबर डिरे (वय 21),बालाजी राम पारसे (वय 27), अंकुश मोतीराम सल्ले (वय 30) तिघे राहणार मंनगोळी दक्षिण सोलापूर यांना अटक केली आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमधील १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.