ETV Bharat / state

तरडगाव बंधाऱ्यातून गळती सुरूच; ठेकेदारांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर - करमाळा तालुक्यातील नद्या

सीना नदीतील तरडगाव बंधाऱ्याला दरवाजे बसवून काही प्रमाणात पाणी आडवण्याचा प्रयत्न होत असला तरीही, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सीना नदीतील बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.
author img

By

Published : Oct 31, 2019, 2:16 PM IST

सोलापूर - यावर्षी लांबलेल्या परतीच्या पावसाने सीना नदीत मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे. या नदीतील तरडगाव बंधाऱ्याला दरवाजे बसवून काही प्रमाणात पाणी आडवण्याचा प्रयत्न होत असला तरीही, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, तत्काळ गळती न थांबवल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

seena river news
ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सीना नदीतील बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

करमाळा तालुक्यातील सीना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून, या बंधाऱ्याला तीन वर्षांपूर्वी पाणी आले होते. त्यावेळीही या बंधाऱ्यातील काही दरवाजे तुटल्याने वाहून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन ठेकेदाराच्या साहाय्याने दरवाजे बसवले. यावर्षी ज्यादा पाऊस झाल्याने पुन्हा अशी परिस्थिती टाळण्यासाठी गावकऱ्यांकडून बंधाऱ्याचे दरवाजे दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.

हा बंधारा 60 एमसीएफटी क्षमतेचा असून या पाण्यावर तरडगाव, पाडळी, खडकी, आळजापूर व जवळा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होतो. तरडगाव बंधाऱ्याला जवळपास 297 दरवाज्यांची गरज आहे. मात्र, शासनाने दोनशे दरवाजे दिल्याने अन्य दरवाज्यांमधून पाणी वाहून जात आहे. तसेच जुन्या लोखंडी दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. परंतु, शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या डागडुजीचे प्रयत्न होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

Intro:Body:करमाळा प्रतिनिधी - शितलकुमार मोटे

Slug - करमाळा - तरडगाव बंधाऱ्यातून पाणीगळती गळती सुरू

Anchor - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून या पावसाच्या पाण्याने सीना नदीला काही अंशी पाणी आले आहे. त्यामुळे तरडगाव बंधाऱ्याला दरवाजे टाकून तात्काळ पाणी अडविण्यात आले. मात्र हे अडवलेले पाणी अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्ष पणामुळे त्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. पाणी येऊनही ठेकेदाराच्या दुर्लक्ष पणामुळे येथील शेतकर्‍यांना पुन्हा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यात तीव्र नाराजी निर्माण झाली असून तात्काळ पाणी गळती थांबवली नाहीतर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Vo - तरडगाव तालुका करमाळा येथील सिना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून या बंधाऱ्याला तीन वर्षांपूर्वी पाणी आले होते. त्यावेळीही या बंधार्‍यातील काही दरवाजे तुटून वाहून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन ठेकेदाराच्या साह्याने दरवाजे बसवण्यात आले होते. हा बंधारा 60 एमसीएफटी क्षमतेचा असून या पाण्यावर तरडगाव, पाडळी, खडकी, आळजापूर व जवळा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होतो. या बंधाऱ्याला जवळपास 297 दरवाजे लागतात. मात्र शासनाने दोनशे दरवाजे दिल्याने ते कमी पडतात व काही नवीन दरवाजे बसत नसल्याने जुने लोखंडी दरवाजे वापरावे लागतात. यातून मोठ्या प्रमाणात गळती होते. ही गळती थांबण्यासाठी ठेकेदाराकडून प्लॅस्टिक अथवा माती टाकून गळती थांबवणे गरजेचे असताना असे कुठल्याही स्वरूपाचे प्रयत्न केले जात नाहीत. सध्या या बंधाऱ्यात साडेपाच दरवाजे पाणी आहे. मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात सध्या गळती सुरू आहे. त्यामुळे पाणी कमी होत असून तात्काळ गळती थांबवणे गरजेचे आहे. दुष्काळी स्थिती नंतर आलेले पाणी हे ठेकेदाराच्या दुर्लक्ष पणामुळे वाहून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

(दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा स्थितीत पाणी अडवणे खूप गरजेचे आहे. पणी गळती थांबविण्यासाठी शासनाने व ठेकेदाराने तात्काळ सहकार्य करावे. डॉ.अमोल घाडगे सरपंच तरडगाव)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.