ETV Bharat / state

Solapur News : घरमालकाची अघोरी अंद्धश्रद्धा! भाडेकरुला अमावस्या असल्याने रात्रभर मृतदेह ठेवायला सांगितला घराबाहेर

सोलापुरातील गोदुताई विडी घरकुल परिसरात माणुसकी संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमावस्या असल्याने घरमालकाने भाडेकरूचा मृतदेह घरात घेण्यास नकार दिल्याने, मृतदेहाला रात्रभर बाहेर ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली.

author img

By

Published : Jul 19, 2023, 5:44 PM IST

Solapur News
रात्रभर मृतदेहाला घराबाहेर ठेवले

सोलापूर : शहरानजीक असलेल्या कामगारांच्या वसाहतीत धक्कादायक घटना घडली आहे. गोदुताई विडी घरकुल परिसरात माणुसकी हरपल्याचे चित्र समोर आले आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदुताई विडी घरकुल परिसरात वास्तव्यास असलेल्या एका गरीब कुटुंबाला, घरमालकाकडून अत्यंत हीन वागणूक मिळाली आहे. शंकर यल्लप्पा मुटकिरी (वय 49 रा,गोदुताई विडी घरकुल) यांचा मृतदेह रात्रभर बाहेर ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली. मृत्यू झालेल्या शंकर मुटकिरी यांच्या घरात वृद्ध आई व गतिमंद भावाच्या मदतीला कोणीच आले नाही. रात्रभर मृतदेह पावसात भिजत घराबाहेर ठेवल्याने, सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमावस्या असल्याने मृतदेह बाहेर : शंकर मुटकिरी यांचा सोमवारी रात्री आजारपणामुळे मृत्यू झाला होता. सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह घरी आणल्यावर घरमालकाने अमावस्या असल्याने, मृतदेह घरात आणू दिला नाही. मृत्यू झालेल्या शंकर मुटकिरी यांची आई नागमणी मुटकिरी या वृद्ध आणि भाऊ अनिल मुटकिरी हा अपंग व गतिमंद आहे. घरातील कर्तापुरुषच गेल्याने अंत्यसंस्कार करणे अवघड झाले होते. सोमवारी रात्री नातेवाईकांनी देखील पाठ दाखवल्याने, वृद्ध आई व अपंग भावावर मृतदेह तसाच रात्रभर घराबाहेर ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होताच गोदुताई विडी घरकुल परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या वसीम मुल्ला, विल्यम ससाणे, बापू साबळे आणि इतर नातेवाईकांनी मंगळवारी अंत्यविधी केला.

पावसात रात्रभर मृतदेह घराबाहेर : शंकर यल्लप्पा मुटकिरी हे शिलाई कामगार म्हणून काम करत होते. त्यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे शंकर मुटकिरी हे पलंगावर खिळून पडले होते. सोमवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शंकर यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्रीच आजूबाजूच्या नागरिकांनी मृतदेह घरी आणून दिला व अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. अमावस्या असल्याने घरमालकाने आडकाठी घातली व मृतदेह घरात आणू दिला नाही. मृताची आई ही वृद्ध व भाऊ अनिल हा अपंग असल्याने त्यांना अंत्यसंस्कार करण्यास जमले नाही. शेवटी सोमवारी रात्रभर मृतदेह घराबाहेर ठेवावा लागला. मंगळवारी सकाळी पावसात भिजत असलेले पार्थिवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मंगळवारी अंतिम संस्कार : गोदुताई विडी गृहनिर्माण संस्थेचे विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बापू साबळे यांनी मंगळवारी नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. कामगार नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. नरसय्या आडम यांनी ताबडतोब अंतिमसंस्कर करा अशा सूचना दिल्या. तसेच अंतिमविधीसाठी रोख रक्कम दिली. अंत्यसंस्कारावेळी पाच ते सहा नातेवाईक हजर झाले. त्यानंतर ससाणे आणि वसीम मुल्ला यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली व मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा -

  1. Self Immolation घरकुल मिळत नसल्याने महिलेने घेतले अंगावर पेट्रोल
  2. Solapur Crime: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.