ETV Bharat / state

मोर्चा बघुन दडत्यात... कामगार प्रश्नी अंगणवाडी सेविकेचा क्रांती गीतातून सरकारवर आसूड

चंपाबाई या माढा तालुक्यातील उपळाईच्या रहिवासी आहेत.1990 ला पहिल्यांदा बालवाडी शिक्षिका म्हणून त्या सेवेत रूजू झाल्या होत्या. पुढे वर्ष 2000 मध्ये त्या अंगणवाडी सेविका झाल्या. त्यांना लहानपणापासूनचं गाणी आणि कवितांचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत कामगार,स्त्री, बचतगट, शिक्षण, ऐक्य आणि जात्यावरची असंख्य गाणी लिहिली आहेत. त्याची एक झलक आजच्या आंदोलनस्थळी पाहायला मिळाली.

कामगार प्रश्नी अंगणवाडी सेविकेचा क्रांती गीतातून सरकारवर आसूड

author img

By

Published : Jan 8, 2020, 8:35 PM IST

Updated : Jan 8, 2020, 9:55 PM IST

सोलापूर - देशात सरकार आणि विरोधक राजकीय आघाड्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी ट्विटर वार सुरू आहे. सोलापुरात मात्र, बुधवारी एका अंगणवाडी सेविकेने आपल्या क्रांतिगीताद्वारे सरकारच्या धोरणांवर शाब्दिक आसुडाचे फटकारे ओढले आहेत. निमित्त होतं शासकीय कर्मचारी आंदोलनाचं. या अंगणवाडी सेविकेनं तिच्या धारधार ग्रामीण शब्द रचनेतून कष्टकरी वर्गाचं दुःख तर मांडलेचं, त्याचबरोबर सत्ताधारी सरकारचे वाभाडं देखील आपल्या गितातून काढले आहेत. चंपाबाई भगवान जाधव असे त्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

कामगार प्रश्नी अंगणवाडी सेविकेचा क्रांती गीतातून सरकारवर आसूड
केंद्र शासनाच्या धोरणांना विरोध म्हणून आज शासकीय कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली होती. त्याच निमित्ताने सोलापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 कर्मचारी संघटनांनी निदर्शन आंदोलन केले. या आंदोलनकर्त्या संघटनांमध्ये एक अंगणवाडी सेविकांचीही संघटना होती. त्यातील चंपाबाई भगवान जाधव या अंगणवाडी सेविकेनं सहकारी कर्मचाऱ्यांत स्फुलिंग चेतविण्यासाठी आपलं क्रांतिगीत सादर केले. त्यांच्या या गिताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

चंपाबाई या माढा तालुक्यातील उपळाईच्या रहिवासी आहेत.1990 ला पहिल्यांदा बालवाडी शिक्षिका म्हणून त्या सेवेत रूजू झाल्या होत्या. पुढे वर्ष 2000 मध्ये त्या अंगणवाडी सेविका झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गाणी आणि कवितांचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत कामगार, स्त्री, बचतगट, शिक्षण, ऐक्य आणि जात्यावरची असंख्य गाणी लिहिली आहेत. त्याची एक झलक आजच्या आंदोलनस्थळी पाहायला मिळाली.

रेल्वे स्टेशनवरच्या राणू मंडलचा आवाज एका रात्रीत जगभर पोहोचला. अगदी त्याच जातकुळीतल्या आणि अनेक स्फूर्ती गीतांच्या जन्मदात्या या चंपाबाईंचं टॅलेंट समाज माध्यमातून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत तरी पोहोचवता येईल का? ते पहावं लागेल.

Intro:सोलापूर : देशांत सरकार आणि विरोधक राजकीय आघाड्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी ट्विटर वार करत असताना, सोलापुरात आज एका अंगणवाडी सेविकेनं आपल्या क्रांतिगीताद्वारे सरकारच्या धोरणांवर शाब्दिक आसुडाचे फटकारे लगावले...निमित्त होतं शासकीय कर्मचारी आंदोलनाचं. या अंगणवाडी सेविकेनं टोकदार ग्रामीण शब्द रचनेतून कष्टकरी वर्गाचं दुःख तर मांडलंचं पण त्या बरोबर सत्ताधारी सरकारचं वाभाडं काढलं.

Body:केंद्र शासनाच्या धोरणांना विरोध म्हणून आज शासकीय कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली होती.त्याच निमित्ताने सोलापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 कर्मचारी संघटनांनी निदर्शनं केली.याच आंदोलनकर्त्या संघटनांपैकीचं एक अंगणवाडी सेविकांचीही ही संघटना होती. त्यात चंपाबाई भगवान जाधव या अंगणवाडी सेविकेनं सहकारी कर्मचाऱ्यांत स्फुलिंग चेतविण्यासाठी आपलं क्रांतिगीत सादर केलं अन सर्वांचंच लक्ष त्या शब्दांकडं गेलं.
चंपाबाई या माढा तालुक्यातील उपळाईच्या रहिवासी आहेत.1990 त्या पहिल्यांदा बालवाडी शिक्षिका म्हणून लागल्या. सन 2000 साली त्या अंगणवाडी सेविका झाल्या. त्यांना लहानपणापासूनचं गाणी आणि कवितांचा छंद आहे.त्यांनी आतापर्यंत कामगार,स्त्री, बचतगट, शिक्षण,ऐक्य आणि जात्यावरची असंख्य गाणी लिहिली आहेत.त्याची एक झलक आजच्या आंदोलनस्थळी पाहायला मिळाली.

Conclusion: रेल्वे स्टेशनवरच्या राणू मंडलचा आवाज एका रात्रीत जगभर पोहचला.अगदी त्याच जातकुळीतल्या आणि अनेक स्फूर्ती गीतांच्या जन्मदात्या या चंपाबाईंचं टॅलेंट साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत तरी पोहचवता येईल का ते पहावं लागेल.
Last Updated : Jan 8, 2020, 9:55 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.