सोलापूर Congress MLA Praniti Shinde : सोलापूरमध्ये (12 जानेवारी) हा दिवस बरात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. (12 जानेवारी 1931)रोजी सोलापुरातील कुर्बान हुसेन, श्री किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि मल्लप्पा धनशेट्टी यांना इंग्रजांनी फाशी दिली होती. या चार हुतात्म्यांना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र-अपात्र यावर जो निर्णय दिलाय त्यावर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसंच, नार्वेकर यांनी जो निकाल दिलाय तो आम्हाला अपेक्षितचं होता असं विधानही शिंदे यांनी यावेळी केलंय.
प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा रामनवमीला का केली नाही : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा होणार आहे. एप्रिल महिन्यात राम नवमी आहे. त्यावेळी प्राण प्रतिष्ठा झाली असती, तर उत्तम झालं असतं. मात्र, भाजपवाले लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करत असल्याचा थेट आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने यांचे दौरे वाढतात. परंतु, लोकांना ज्यावेळी गरज असते, त्यावेळी त्यांचे दौरे वाढत नाहीत अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
राहुल नार्वेकरांसह मोदींवर टीका : चार हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य केलं. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूकपूर्व महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली. सोलापुरातील चारही हुतात्मे हे वेगवेगळ्या जातीधर्मातून जरी येत असले, तरी आपल्या मातीसाठी त्यांनी बलिदान दिलं. चार हुतात्म्यांचं प्रतीक हे देशासाठी आज महत्वाचं आहे. या मातृभूमीनं कधीही भेदभाव केला नाही. ज्यांनी मातृभूमीसाठी रक्त वाहिले, त्यांच्या रक्ताची कधी जात-पात-जमात नव्हती असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा :
1 केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका; संजय राऊतांची आगपाखड
2 नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
3 ठाकरे गटाकडून अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार, जाणून घ्या कारण